ZIM vs IND Live Streaming: झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया सामने कुठे पाहता येणार?

| Updated on: Jul 02, 2024 | 4:36 PM

Zim vs IND T20I Series Live Streaming: झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने मोबाईल आणि टीव्हीवर कुठे पाहायला मिळतील? जाणून घ्या.

ZIM vs IND Live Streaming: झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया सामने कुठे पाहता येणार?
shubman gill ans sikandar raza ind vs zim
Follow us on

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर आता द्विपक्षीय मालिकांना सुरुवात होणार आहे. येत्या 10 जुलैपासून विंडिज इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. विंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. तर त्याआधी 6 जुलैपासून टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. याआधी वर्ल्ड कपमधील सर्व सामने हे टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळत होते. तर डिज्नी प्लस हॉटस्टार एपद्वारे सामने मोबाईलवर मोफत पाहायला मिळत होते. मात्र आता झिंबाब्बे विरूद्धच्या मालिकेतील सामने नेहमीच्याच चॅनेल्सवर पाहायला मिळणार नाही. हे सामने मोबाईलवर कुठे पाहायला मिळतील, हे जाणून घेऊयात.

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिकेला केव्हापासून सुरुवात होणार?

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिकेला शनिवार 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे.

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया मालिकेतील सामने कुठे?

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया मालिकेतील एकूण 5 सामने हे हरारे स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित करण्यात आले आहेत.

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया मालिकेतील सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार?

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया मालिकेतील सामन्यांना भारतीय वेळेनुसार 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया मालिकेतील सामने टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया मालिकेतील सामने टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तर डीडी स्पोर्ट्स (डीडी फ्री डीश) या चॅनेलवर फुकटात पाहायला मिळेल.

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया मालिकेतील सामने मोबाईलवर कुठे पाहायला मिळतील?

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया मालिकेतील सामने मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळतील.

झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुहर देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) आणि हर्षित राणा.

झिंबाब्वे क्रिकेट टीम: सिकंदर रझा  (कॅप्टन), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, कॅया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अँटम, नगारावा रिचर्ड आणि शुंबा मिल्टन.