Team India: वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाची पहिली टी 20 मालिका, जाणून घ्या वेळापत्रक

| Updated on: Jul 02, 2024 | 3:59 PM

Team India Upcoming T20i Schedule: टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात टी 20 मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

Team India: वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाची पहिली टी 20 मालिका, जाणून घ्या वेळापत्रक
team india yongest squad
Image Credit source: BCCI
Follow us on

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडिया आता पहिली मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया नवा कोच आणि नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडिया या टी 20 सीरिजसाठी झिंबाब्बे दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत शुबमन गिल भारतीय संघाचं नेतृ्त्व करणार आहे. तर एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचे कोच असणार आहेत. या मालिकेचं वेळापत्रक आणि ठिकाण जाणून घेऊयात.

झिंबाब्वे विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेला येत्या शनिवार 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पाचही सामने एकाच ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. या सर्व सामन्यांचं आयोजन हे हरारे स्पोर्ट्स क्लब येथे करण्यात आलं आहे. बीसीसीआय निवड समितीने या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संधी दिली आहे.तसेच आता 2 जुलै रोजी टीम इंडिया ऐनवेळेस 3 बदल केले आहेत. झिंबाब्वे विरूद्धच्या मालिकेसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा या तिघांना अनुक्रमे संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांच्या जागी संधी देण्यात आली आहे. हे बदल पहिल्या 2 सामन्यांसाठी करण्यात आले आहेत. संजू, शिवम आणि यशस्वी हे वर्ल्ड कप मुख्य संघात होते. मात्र बारबाडोसमधील स्थितीमुळे टीम इंडिया अजूनही तिथेच अडकून पडली आहे. त्यामुळे या तिघांऐवजी युवा खेळाडूंना संधी देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

तसेच झिंबाब्वेने या मालिकेसाठी 1 जुलै रोजी संघ जाहीर केला. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणारा सिकंदर रझा याला झिंबाब्वेचं नेतृत्व देण्यात आलं आहे. त्यामुळे युवा शुबमन गिलसमोर तगडं आव्हान असणार आहे.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना 6 जुलै, दुसरा सामना 7 जुलै, तिसरा सामना 10 जुलै, चौथा सामना 13 जुलै, पाचवा सामना 14 जुलै.

झिंबाब्वे विरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुहर देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर) आणि हर्षित राणा.

झिंबाब्वे क्रिकेट टीम: रझा सिकंदर (कॅप्टन), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, कॅया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अँटम, नगारावा रिचर्ड आणि शुंबा मिल्टन.