ZIM vs IND: टी 20 सीरिजसाठी झिंबाब्वे संघाची घोषणा, शुबमन गिलसमोर या कॅप्टनचं आव्हान

| Updated on: Jul 01, 2024 | 7:46 PM

Zimbabwe Squad For T20I Series Against India: झिंबाब्वे क्रिकेट बोर्डाने 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. जाणून घ्या.

ZIM vs IND: टी 20 सीरिजसाठी झिंबाब्वे संघाची घोषणा, शुबमन गिलसमोर या कॅप्टनचं आव्हान
IND VS ZIM
Follow us on

टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 नंतर झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात झिंबाब्वे विरुद्ध एकूण 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पाचही सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाची या मालिकेसाठी 24 जून रोजी घोषणा करण्यात आली आहे. तर आता झिंबाब्वे क्रिकेट टीमने 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. झिंबाब्वे क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

सिकंदर रझाकडे नेतृत्व

टीम इंडिया विरूद्धच्या मालिकेसाठी सिकंदर रझा याला झिंबाब्वेच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. सिकंदर ऑलराउंडर आहे. त्याने झिंबाब्वेला अनेक सामने एकहाती जिंकून दिलेले आहेत. तसेच सिकंदर आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळतो. झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. सिकंदर या खेळाडूंसह आयपीएलमध्ये खेळला आहे. त्यामुळे सिकंदरच्या या अनुभवाचा फायदा संपूर्ण टीमलाही मिळणार आहे.

झिंबाब्वे संघाची घोषणा


झिंबाब्वे क्रिकेट टीम: रझा सिकंदर (कॅप्टन), अक्रम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, चतारा तेंडाई, जोंगवे ल्यूक, कॅया इनोसंट, मदांडे क्लाइव्ह, मधेवेरे वेस्ली, मारुमणी तादिवानाशे, मसाकादझा वेलिंग्टन, मावुता ब्रँडन, मुझाराबानी ब्लेसिंग, मायर्स डिओन, नक्वी अँटम, नगारावा रिचर्ड आणि शुंबा मिल्टन.

झिंबाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकटेकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर ), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे आणि शिवम दुबे.