एडिलेड: T20 World Cup 2022 मध्ये एकापेक्षा एक रोमांचक सामने पहायला मिळतायत. सुपर 12 ग्रुप-2 मध्ये असच पहायला मिळतय. आज नेदरलँड्स आणि झिम्बाब्वेमध्ये एडिलेड येथे मॅच झाली. या मॅचमध्ये नेदरलँड्सने झिम्बाब्वेला 5 विकेट्सने हरवलं. या विजयासह नेदरलँड्सने झिम्बाब्वेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या अपेक्षांना सुरुंग लावलाय.
झिम्बाब्वेसाठी आता समीकरण कसं असेल?
झिम्बाब्वेची टीम आता 4 सामन्यात 3 पॉइंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेचा शेवटचा सामना आता भारताविरुद्ध होणार आहे. झिम्बाब्वेला या मॅचमध्ये जिंकावच लागेल. त्याशिवाय दुसऱ्या टीमच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल. नेदरलँड्सच्या टीमने विजय मिळवलाय. पण तरीही त्यांचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलय. सुपर 12 राऊंडमध्ये नेदरलँड्सने आज पहिला विजय मिळवला.
A good performance from Netherlands to seal a victory against Zimbabwe in Adelaide ?#T20WorldCup | #ZIMvNED | ?: https://t.co/YYZiU8BZwC pic.twitter.com/Zn5OlpUeDH
— T20 World Cup (@T20WorldCup) November 2, 2022
कोणामुळे नेदरलँड्सने जिंकला सामना?
आजच्या मॅचमध्ये झिम्बाब्वेने पहिली बॅटिंग केली. 19.2 ओव्हर्समध्ये त्यांचा डाव 117 धावात आटोपला. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझाने सर्वाधिक 40 आणि सीन विलियमसने 28 धावा केल्या. नेदरलँड्सने 18 व्या ओव्हरमध्ये 5 विकेटस गमावून विजयी लक्ष्य गाठलं. मॅक्स ओडॉड नेदरलँड्सच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने 47 चेंडूत 52 धावा केल्या. त्याशिवाय टॉम कूपरने 29 चेंडूत 32 धावा केल्या.
टीम | सामने | विजय | पराजय | रनरेट | पॉइंट्स |
---|---|---|---|---|---|
भारत | 4 | 3 | 1 | +0.730 | 6 |
पाकिस्तान | 5 | 3 | 2 | +1.028 | 6 |
दक्षिण आफ्रिका | 5 | 2 | 2 | +0.874 | 5 |
नेदरलँड्स | 5 | 2 | 3 | -0.849 | 4 |
बांग्लादेश | 5 | 2 | 3 | -1.176 | 4 |
झिम्बाब्वे | 4 | 1 | 2 | -0.313 | 3 |