बार्बाडोसमध्ये मागच्या शनिवारी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने 13 वर्षापासूनच ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. फायनल जिंकल्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या तिन्ही दिग्गजांनी T20 मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. टीममध्ये ओपनर, नंबर 3 आणि लेफ्ट आर्म ऑलराऊंडरची जागा रिकामी झाली आहे. भविष्यात एक नवीन टीम इंडिया पहायला मिळणार आहे. टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली आहे. बीसीसीआय या टूरवर तीन पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. यात T20 कॅप्टनशिपवर फोकस असेल.
शुभमन गिलने आधीच आपली फलंदाजीची क्षमता सिद्ध केली आहे. T20 आणि वनडे फॉर्मेटमध्ये आतापर्यंत शानदार फलंदाजी केली आहे. भारतीय टीमचा तो एक अविभाज्य भाग बनला आहे. मागच्या काही काळापासून त्याची बॅट शांत आहे. त्यामुळे त्याला T20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळू शकलं नाही. आता पुन्हा एकदा त्याच्याकडे क्षमता दाखवण्याची संधी आहे. झिम्बाब्वे दौऱ्यात शुभमन गिल पहिल्यांदा टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. फलंदाजीसोबत चांगली कॅप्टनशिप केली, तर तो T20 च्या पुढच्या कॅप्टनशिपसाठी दावेदार ठरु शकतो.
सर्व निकषांमध्ये एकदम फिट बसतो
पाच मॅचची ही सीरीज टीम इंडियाने सहज जिंकली, तर कॅप्टनशिपसाठी गिल सुद्धा दावेदार ठरेल. अशामध्ये हार्दिक पांड्याच नुकसान होऊ शकतं. पांड्या या शर्यतीत मागे पडेल, त्याला इंजरी सुद्धा एक कारण आहे. हार्दिक पांड्या अनेकदा त्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर असतो. अशावेळी बीसीसीआय रोहित शर्माच्या जागी मजबूत पर्यायाच्या शोधात आहे. गिल फिटनेसपासून फलंदाजी सर्व निकषांमध्ये एकदम फिट बसतो. त्याशिवाय छोट्या वयात तो भारतीय क्रिकेटमधील मोठा चेहरा बनलाय.
आधी कुठे नेतृत्व केलय?
शुभमन गिल पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे. आयपीएल 2024 मध्ये हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्स सोडल्यानंतर गिलने नेतृत्वाची धुरा संभाळली. कॅप्टनशिपच्या दृष्टीने आयपीएलचा हा सीजन त्याच्यासाठी खास ठरला नाही. गुजरात टायटन्सची टीम प्लेऑफसाठी क्वालिफाय करु शकली नाही. याआधी अंडर-19 मध्ये तो टीम इंडियाचा उपकर्णधार होता. 2019 देशांतर्गत क्रिकेटमध्ये दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया ब्लू चा कॅप्टन होता. देवधर ट्रॉफीमध्ये इंडिया सी च नेतृत्व केलय.