एकदिवसीय सामन्यात 194 धावांची शतकी खेळी, तरीही टीम पराभूत, बांग्लादेशनं कसं नमवलं?

| Updated on: Aug 16, 2021 | 11:58 AM

अलीकडे एकदिवसीय क्रिकेटमध्ये बऱ्याच देशाच्या खेळाडूंनी दुहेरी शतक ठोकलं आहे. पण पूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधील 194 ही व्यक्तीगत सर्वोच्च धावसंख्या होती.

एकदिवसीय सामन्यात 194 धावांची शतकी खेळी, तरीही टीम पराभूत, बांग्लादेशनं कसं नमवलं?
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

मुंबई : एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्‍च व्‍यक्तिगत स्‍कोर भारतीय सलामीवीर रोहित शर्मा (264) याच्या नावावर आहे. त्याने 1-2 नाही तर 3 दुहेरी शतकं ठोकली आहेत. रोहितनंतर इतर संघाच्या खेळाडूंनीही असा कारनामा केला आहे. पण सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात पहिल्यांदा दुहेरी शतक ठोकण्याआधी सर्वात मोठा व्‍यक्तिगत स्‍कोर म्हटलं तर पाकिस्‍तानचा दिग्‍गज फलंदाज सईद अनवर (194) आठवतो. पण सईदसह आणखी एका खेळाडूने हा कारनामा केला होता. झिम्‍बाब्‍वे क्रिकेट संघाचा (Zimbabwe Cricket Team) चार्ल्‍स कोवेंट्री (Charles Coventry) असं या खेळाडूच नाव असून त्याने 194 धावांची विध्‍वंसक खेळी बांग्लादेश संघाविरुद्ध केली होती. पण प्रतिस्पर्धी संघाच्या चोख पलटवारामुळे चार्ल्सचा संघ विजयी होऊ शकला नाही.

या सामन्याबद्दल आज सांगायचं कारण की, हा ऐतिहासिक सामना झिम्‍बाब्‍वे आणि बांग्लादेश यांच्यात आजच्याच दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट, 2009 रोजी झाला होता.  सामन्यात सर्वात आधी झिम्‍बाब्‍वे संघाने प्रथम फलंदाजी करत 8 विकेट्सच्या बदल्यात 312 धावा केल्या. यात चार्ल्‍स कोवेंट्रीच्या 194 धावांमुळे संघाने 300 चा आकडा पार केला. त्याने 156 चेंडूत 16 चौकार आणि 7 षटकार लगावले.

तमीम इकबालने जिंकवला सामना

झिम्‍बाब्‍वेच्या फलंदाजामनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता गोलंदाजावर सामना जिंकवून देण्याची जबाबदारी होती. पण गोलंदाजानी अनपेक्षित अशी अत्यंत खराब कामगिरी केली. ज्यामुळे बांग्‍लादेशने केवळ 6 विकेट गमावत 47.5 षटकांतच टार्गेट पूर्ण करत सामना खिशात घातला. यात त्यांचा सलामीवीलर तमीम इकबालने अप्रतिम 154 धावांची खेळी केली. त्याने 138 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकार ठोकले. त्याला जुनैद सिद्दीकीने 35 धावांची मदत करत सामना जिंकवून दिला.

हे ही वाचा

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

IND vs ENG : रहाणेचं अर्धशतक, चौथ्या दिवसअखेर भारताची 6 बाद 181 धावांपर्यंत मजल, रिषभ पंतवर मदार

पुजाराच्या बॅटिंगवर सगळीकडून टीकेची झोड, आता दिग्गज खेळाडू म्हणतो, ‘द वॉल’च्या जागी सूर्यकुमारला खेळवा!

(zimbabwes charles coventry scored 194 runs against bangladesh on this day)