मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे मध्ये उद्या गुरुवारपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. या मालिकेआधी झिम्बाब्वे मध्ये क्रिकेटची स्थिती काय आहे? ते तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे. झिम्बाब्वे मध्ये खेळ आणि खेळाडू दोघांची स्थिती खराब आहे. तिथे खेळाडूंच रोजच आयुष्य संघर्षमय आहे. बोर्डाकडून मदत दूरची गोष्ट राहिली, खेळाडूंना आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करणही जमत नाहीय. झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू गरीबी मध्ये जीवन जगत आहेत. फक्त क्रिकेटच नाही, तिथे खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक खेळामध्ये खेळाडूंची अशीच स्थिती आहे. कोरोनामुळे झिम्बाब्वे मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल बंद करण्यात आलं. अजून पर्यंत हा निर्णय कायम आहे. त्याचा परिणाम तिथल्या खेळाडूंवर दिसून येतो. त्यामुळे त्या खेळाडूंनी मनी गेम कडे मोर्चा वळवला आहे. जेणेकरुन रोजच्या गरजा पूर्ण करता येतील. मनी गेम म्हणजे फुटबॉल सामन्यामधून मिळणारे उत्पन्न. क्लबकडून खेळण्यासाठी खेळाडूंना पैसे मिळतात.
Aljazeera च्या एका रिपोर्ट्नुसार क्लबसाठी फुटबॉल खेळणाऱ्या एका खेळाडूला महिन्याला सरासरी झिम्बाब्वे मध्ये 5000 डॉलर मिळतात. इतके डॉलर म्हणजे तुम्हाला खूप मोठी रक्कम वाटेल, पण असं नाहीय. भारतीय रुपयांमध्ये त्याच मुल्य फक्त 1100 रुपये आहे. म्हणजे मजुरांसारखी झिम्बाब्वेच्या फुटबॉलपटूंची स्थिती आहे. कारण मजुरांना महिन्याला अशा प्रकारचं वेतन मिळतं.
झिम्बाब्वे मध्ये मनी गेम मध्ये सहभागी होणं बेकायद आहे. सरकारी नियमांच्या विरुद्ध आहे. पण झिम्बाब्वे मध्ये आंतरराष्ट्रीय सामने बंद आहेत. त्यामुळे खेळाडूंकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. झिम्बाब्वेची राजधानी हरारे शहरात होणाऱ्या अशा फुटबॉल सामन्यांना स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
झिम्बाब्वे मध्ये मनी गेम अनेक वर्षांपासून खेळला जात आहे. देशात फुटबॉलचा ऑफ सीजन असताना मनी गेम खेळला जातो. आता यात देशातील काही हाय प्रोफाइल फुटबॉलपटू दिसू लागले आहेत. कोरोनामुळे त्यांनी तिथे मोर्चा वळवलाय. रोजच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागलाय.