T10 league : 3 चेंडूत 30 धावा, कसं काय? श्रीलंकेच्या ऑलराऊंडवर प्रश्नचिन्ह

| Updated on: Nov 27, 2024 | 10:11 AM

T10 league : या T10 लीगची मागच्या काही वर्षांपासून चर्चा आहे. आता जगातील नामवंत क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळत आहेत. या लीगमध्ये लज्जास्पद आणि चक्रावून टाकणाऱ्या गोलंदाजीची उदहारण समोर येत आहेत. ज्या गोलंदाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालय, तो श्रीलंकेचा प्रसिद्ध ऑलराऊंडर आहे.

T10 league : 3 चेंडूत 30 धावा, कसं काय? श्रीलंकेच्या ऑलराऊंडवर प्रश्नचिन्ह
abu dhabi t10 league
Image Credit source: Screenshot/x
Follow us on

प्रोफेशनल क्रिकेटमध्ये मागच्या काही वर्षात गोलंदाजांच्या धुलाईचे अनेक नवनवीन रेकॉर्ड झाले आहेत. काहीवेळा एका ओव्हरमध्ये 30 रन्स, 36 रन्स इतकच काय 42 रन्स सुद्धा बनले आहेत. वेगवेगळ्या टुर्नामेंटसमध्ये इतक्या धावा कुटल्या आहेत. पण, एका ओव्हरमध्ये 3 चेंडूत 30 धावा, हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं ना?. इतकच नाही, त्या ओव्हरमध्ये क्रीजच्या एक फुट बाहेर पाय टाकून नो बॉलही पहायला मिळाला. हे सर्व झालं, अबू धाबी T10 लीगच्या एका सामन्यात. या गोष्टी तिथल्या टुर्नामेंटमध्ये आता सामान्य बाब झाली आहे. मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप होत आहेत. क्रिकेटच्या सर्वात छोट्या अनधिकृत फॉर्मेटमध्ये मागच्या 4-5 वर्षांपासून अबू धाबी T10 लीगची ओळख बनली आहे. या लीगमध्ये सुरुवातीला ओळख नसलेले किंवा कमी प्रसिद्ध असलेले क्रिकेटपटू खेळायचे. पण t20 आणि t10 क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे जगातील प्रसिद्ध क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळत आहेत. तुफानी फलंदाजी पहायला मिळतेय. पण इथे होणारी गोलंदाजी मस्करीचा विषय बनली आहे.

ताज प्रकरण 25 नोव्हेंबरच आहे. दिल्ली बुल्स आणि बांग्ला टायगर्सच्या टीममध्ये सामना सुरु होता. या मॅचमध्ये दिल्लीच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 10 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 123 धावा केल्या. दिल्लीसाठी या मॅचमध्ये आठव्या नंबरवर फलंदाजीला आलेल्या निखिल चौधरीने सर्वाधिक 47 धावा केल्या. ते ही फक्त 16 चेंडूत. यात 7 चौकार आणि 2 षटकार होते. यात निखिलने 28 धावा एकाच ओव्हरमध्ये फटकावल्या.

फटकेबाजी करणाऱ्या बॅट्समनपेक्षा बॉलरची चर्चा का?

निखिलने चौकार-षटकार ठोकून धावा वसूल केल्या. पण चर्चा निखिलची नाही, तर ओव्हर टाकणाऱ्या बॉलरची आहे. हा बॉलर होता, दासुन शानका. श्रीलंकेचा हा प्रसिद्ध ऑलराऊंडर आहे. त्याने या ओव्हरमध्ये 33 धावा दिल्या. पण 30 धावा अवघ्या 3 चेंडूत निघाल्या. 3 लीगल चेंडूत 30 धावा निघाल्या. हे शक्य यामुळे झालं की, शानकाने खराब गोलंदाजीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने 3 चेंडूसह 4 नो-बॉल टाकले.

एकाच ओव्हरमध्ये किती नो-बॉल

शानकाच्या पहिल्या चेंडूवर निखिलने चौकार लगावला. त्यानंतर पुढचे दोन चेंडू नो बॉल टाकले. त्यावरही चौकार वसूल केले. दुसऱ्या योग्य चेंडूवर पुन्हा चौकार मारला. त्यानंतर तिसऱ्या नो बॉलवर सिक्स मारला. त्यानंतर पुन्हा नो बॉल टाकला. पण त्यावर धाव निघाली नाही. त्यानंतर पुन्हा नो बॉल त्यावर चौकार. म्हणजे या ओव्हरमध्ये चित्र असं होतं, 4, 4(nb),4(nb),4,6,(nb),4(nb).


टुर्नामेंट बंद करण्याची मागणी

शानकाने त्यानंतर 3 चेंडूत फक्त एक रन्स दिला. अशा प्रकारे एका ओव्हरमध्ये त्याने 33 धावा दिल्या. शानकाची नो बॉल टाकण्याची पद्धत चक्रावून टाकणारी होती. एका नो बॉलमध्ये त्याचा पाय क्रीजच्या एक फुट बाहेर होता. साधारणत: एक-दोन सेंटीमीटरपर्यंत पाय बाहेर जातो. एक फुट पाय बाहेर गेल्याने संशय निर्माण झाला आहे. अनेक फॅन्सनी सोशल मीडियावर ही फिक्सिंग असल्याच म्हटलं आहे. टुर्नामेंट बंद करण्याची मागणी केली आहे.