पुणे : फुटबॉलला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याचा क्रीडा विभाग आणि जर्मनीच्या एफसी बायर्न क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आजपासून क्वार्टर फायनलचे सामने सुरु होणार आहेत. पुण्यातील बालेवाडी येथील फुटबॉल ग्राऊंडवर हे सामने होणार आहेत. राज्यात सर्वदूर फुटबॉलचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धा आयोजित करण्यात आली. मोठ्या संख्येने शाळा आणि हजारो मुल या फुटबॉल स्पर्धेत सहभागी झाली होती.
अंतिम टप्प्यात 9 टीम्स
त्यांनी आपल फुटबॉल कौशल्य दाखवलं. जिल्हावार स्पर्धा झाल्यानंतर, विभागवार स्पर्धा पार पडली. विभागवार गटातून आता अंतिम फेरीत नऊ संघांची वर्णी लागली आहे. आज क्वार्टर फायनल आणि उद्या सेमीफायनलचे सामने होतील. एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेत सर्वोत्तम कौशल्य दाखवणाऱ्या 20 मुलांची निवड करण्यात येणार आहे. या 20 मुलांना अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी जर्मनीला पाठवण्यात येईल.
या दोन टीम्समध्ये क्वार्टर फायनलचा पहिला सामना
क्वार्टर फायनलचा पहिला सामना नागपूर आणि नाशिक या दोन टीम्समध्ये होणार आहे. नागपूरमधुन सेंट जॉन्स हायस्कूलने अंतिम फेरीत धडक मारली आहे. नाशिकमधून बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
20 मुलांना निवडणार
एफसी बायर्न या जगप्रसिद्ध फुटबॉल क्लबमध्ये या 20 मुलांना फुटबॉलच विशेष ट्रेनिंग दिलं जाईल. जेणेकरुन, त्यांच्या फुटबॉल खेळण्याच्या टेक्निकमध्ये अधिक सुधारणा होईल. भारतात फुटबॉल चाहत्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. लहानांपासून वुद्धांपर्यंत फुटबॉलची आवड असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण त्या तुलनेत फुटबॉलची मैदानं, ट्रेनिंग सुविधा नाहीत.
एफसी बायर्न क्लबबद्दल जाणून घ्या
जर्मनीत फुटबॉलमध्ये प्रोफेशनलिजम आहे. लहानपणापासून तिथे उत्तम दर्जाचे फुटबॉलपटून घडवण्यावर मेहनत घेतली जाते. यात एफसी बायर्न क्लब आघाडीवर आहे. ऑलिव्हर कान, गर्ड म्युलर हे जगप्रसिद्ध फुटबॉलपटू याच क्लबने घडवले. आता महाराष्ट्रातील 20 मुलांना या क्लबमध्ये फुटबॉलचे धडे दिले जातील. एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप ही अंडर 14 वयोगटाची स्पर्धा आहे.
सेंट जॉन्स हायस्कूल, नागपूर
जोगराज बिट्टा, सुमित रणसिंग, एमडी महाविया, अब्दुल शेख, सिद्धार्थ वासनिक, ओजस सिराट, आर्यन कनोजिया, दुपांश थापा, मयंक बोडेले, शायान खान, इशांत कांबळे, तनय उमाटे, ऋषी गटलेवार, गारंग रंगारी, आशिसा जयश्री,इश्मीत बहोरिया, प्रज्वल साखरे, अभिमन्यू साखरे, नयन मर्दी, फिलिप तुडू, प्रणील घोषाल
बार्नस स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नाशिक
आरव तांडले, जोनाथन मेंडेझ, ब्रायन कॉक्स, शादाब सय्यद, केल्विन पायपर, आदित्य शहा, रॉयस सिंह, गोवन सिंह, रुद्र पटेल, रायन धवरे, निबाश सिंह, कृष्ण सिंह, गंधार मयेकर, हृदय शहा, आदित्य सिंह, आदित महाडिक, हनीश सिंग, रणवीर कुमार, युवराज कदम