दोहा: फिफा वर्ल्ड कप 2022 च्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने हरवलं. अर्जेंटिनाचं तब्बल 36 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकण्याच स्वप्न साकार झालं. 3 गोल डागून लियोनल मेस्सी या विजयाचा हिरो ठरला. पण अर्जेंटिनासाठी पेनल्टी शूटआऊटमध्ये गोंजालो मॉन्टियलने विजयी गोल मारला.
लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग
वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर गोंजालो मॉन्टियलने गर्लफ्रेंडसोबत सेलिब्रेशन केलं. अर्जेंटिनाशिवाय मॉन्टियलच्या मनात करीना सुद्धा आहे. दोघांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.
कधीपासून रिलेशनशिपमध्ये?
मॉन्टियलने रिवर प्लेटकडून आपल्या करीअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून तो करीना नाकुचिओसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघे 2019 पासून डेट करतायत.
करीना सर्वात मोठी सपोर्टर
हे जोडपं आपलं खासगी जीवन प्रायव्हेट ठेवण्याचं प्रयत्न करतं. पण अनेकदा मॉन्टियल करीनासोबतचे आपले फोटो शेअर करत असतो. 24 वर्षांची करीना मॉन्टियलची सर्वात मोठी सपोर्टर आहे. अनेकदा ती प्रेक्षक स्टँडमधून मॉन्टियलचा उत्साह वाढवताना दिसते.