भारतातून पाकिस्तानला गेला, जगातला खतरनाक बोलर बनला, हॅट्रिक आणि विकेट्सचा ढीग, 12 षटकार मारुन वर्ल्ड रेकॉर्ड!
पाकिस्तानचे दिग्गज महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आज 55 वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर टाकूया... (Former Pakistan Player Wasim Akram birthday)
1 / 8
पाकिस्तानचे दिग्गज महान वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आज 55 वर्षांचे झाले आहेत. 3 जून, 1966 रोजी पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जन्मलेल्या अक्रम हे जगातील सर्वात वेगवान डावखुरा वेगवान गोलंदाज मानले जायचे. जोपर्यंत ते खेळत होते तोपर्यंत फलंदाजांचे ते कर्दनकाळ होते. मोठ-मोठ्या फलंदाजांना स्विंग आणि रिव्हर्स स्विंगने त्यांनी त्रस्त केलं. वसीम अक्रम यांनी आपल्या गोलंदाजीच्या बळावर क्रिकेटमध्ये बरेच विक्रम आपल्या नावे केले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर एक नजर टाकूया...
2 / 8
वसीम अक्रम यांचं कुटुंब मूळचं अमृतसरमधलं...1947 मध्ये स्वातंत्र्याच्या वेळी जेव्हा फाळणी झाली तेव्हा ते आपल्या कुटुंबासह पाकिस्तानातील कामोंकी येथे स्थायिक झाले. 1984 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अक्रम यांनी वयाच्या 18 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्यांच्या बोलिंगची जादू सगळ्या जगाने पाहिली फक्त दिसून आली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारे ते पहिले गोलंदाज आहेत. 2003 च्या विश्वचषकात त्यांनी हा पराक्रम केला होता.
3 / 8
लिस्ट ए क्रिकेटमध्ये 881 विकेट घेण्याचा विश्वविक्रम वसीम अक्रमच्या नावावर आहे. लिस्ट ए म्हणजे देशांतर्गत क्रिकेटचे 50 षटकांचे सामने.... तसंच, एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर वसीम अक्रम दुसर्या क्रमांकावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये वसीम अक्रमने 17 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला.
4 / 8
इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्येही वसीम अक्रम खूप लोकप्रिय होते. 1988 सालापासून त्यांनी लँकशायर क्रिकेट क्लबकडून खेळायला सुरुवात केली. त्यानंतर 1998 पर्यंत ते या संघाचा मुख्य गोलंदाज होता. ब्रिटनच्या चाहत्यांनी देखील त्यांना डोक्यावर घेतलं. लँकशायरच्या सामन्यांच्या वेळी त्यांचे फॅन्स 'वसीम फॉर इंग्लंड' हे गाणं गायचे. 1998 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लँकशायरने ईसीबी ट्रॉफी, एएक्सए लीग जिंकली आणि कौंटी चॅम्पियनशिपमध्ये दुसरे स्थान पटकावलं.
5 / 8
वसीम अक्रम आयपीएल स्पर्धेचा देखील एक भाग होते. ते कोलकाता नाइट रायडर्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. 2014 मध्ये केकेआरने दुसऱ्यांदा जेतेपद जिंकले तेव्हा ते संघासमवेत होते. स्विंग गोलंदाजीच्या कौशल्यामुळे वसीम यांना 'स्विंगचा सुलतान' म्हटलं जायचं.
6 / 8
वसीम अक्रमक यांच्याकडे बॉल आणि बॅट या दोन्ही अस्त्रांनी सामना जिंकण्याची क्षमता होती. 1996 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी नाबाद 257 धावांची खेळी केली. कसोटीतील आठव्या क्रमांकावरच्या फलंदाजाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या खेळीत त्यांनी 12 षटकार ठोकले. कसोटी डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा हा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
7 / 8
वसीम अक्रम यांनीही पाकिस्तानचं कर्णधारपद भूषवलं. ते इम्रान खानच्या स्टाईलचे कर्णधार असल्याचं बोललं गेलं. इम्रान आणि वसीम अकरम 1992 विश्वचषक जिंकणार्या पाकिस्तान संघाचे सदस्य होते. मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे अक्रमची कर्णधारपदाची कारकीर्द कलंकित झाली होती. यामुळे त्यांना कर्णधारपदाची जबाबदारी मध्येच सोडावी लागली.
8 / 8
वसीम अक्रम यांना वयाच्या 30 व्या वर्षी मधुमेहाचे निदान झाले. त्यानंतर ते सतत औषधं घेत राहिले. नंतर त्यांनी या आजाराबद्दल जनजागृती करण्याचंही पाऊल उचललं. वसीम अक्रम यांनी 2003 मध्ये विश्वकरंडकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचा सामना खेळले. या स्पर्धेत पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर अक्रम यांना संघातून वगळण्यात आले. पुढे ते निवृत्त झाले होते.