नवी दिल्ली : टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज (Kapil Dev discharged) दिला आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. कपिल देव यांना गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर देव यांना दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टी करण्यात आली होती. Former Team India Captain Kapil Dev discharged from hospital
Dr Atul Mathur did Kapil paji angioplasty. He is fine and discharged. Pic of @therealkapildev on time of discharge from hospital. pic.twitter.com/NCV4bux6Ea
— Chetan Sharma (@chetans1987) October 25, 2020
चेतन शर्मा यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये कपिल देव आणि त्यांच्यावर अॅंजिओप्लास्टी करणारे डॉक्टर अतुल माथुर पाहायला मिळत आहेत. कपिल देव आता ठणठणीत असून ते घरी परतत आहेत, असं चेतन शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. कपिल देव यांच्यासाठी त्यांच्या अनेक चाहत्यांनी प्रार्थना केली होती. कपिल देव यांनी एक ट्विट करत चाहत्यांचे आभार मानले होते. ”तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि काळजीसाठी धन्यावाद. तुम्हा सर्वांचं प्रेम बघून मी भारावून गेलो आहे”, असं ट्वीट त्यांनी केलं होतं.
— Kapil Dev (@therealkapildev) October 23, 2020
कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्ट आणि 225 वनडे सामने खेळले आहेत. देव यांनी टेस्टमध्ये 5 हजार 248 धावा केल्या आहेत. तर 434 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच एकदिवसीय कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या आहेत. तसेच 253 विकेट्सही झटकले आहेत. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता.
संबंधित बातम्या :
Kapil Dev | तुम्हा सर्वांचे आभार, कपिल देव यांचं रुग्णालयातून ट्वीट
Former Team India Captain Kapil Dev discharged from hospital