Gukesh vs Ding World Chess Championship: चीनच्या डिंग लिरेन याला पराभूत करुन भारताचा डी.गुकेश बुद्धिबळाचा नवीन विश्वविजेता बनला आहे. डी.गुकेश याने जगातील सर्वात युवा विश्वविजेता होण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. परंतु त्याची ही वाटचाल सोपी नव्हती. गुकेश याच्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी केलेला संघर्ष मोठा होता. वडिलांनी त्याच्यासाठी नोकरी सोडली होती. मुलाच्या मोठ्या उद्दिष्टासाठी क्राउड-फंडिंग घेण्यात त्यांनी संकोच केला नाही.
डी.गुकेश केवळ 18 व्या वर्षी बुद्धिबळाचा विश्वविजेता बनला. या सर्वोच्च पातळीवर पोहचण्यासाठी डी.गुकेश याच्या आई-बाबांनी मोठा त्याग केला आहे. त्याचे वडील रजनीकांत ईएनटी सर्जन आहेत. आई पद्मा माइक्रोबायोलॉजिस्ट आहे. मुलासाठी रजनीकांत यांना 2017-18 आपली वैद्यकीय प्रॅक्टीस थांबवावी लागली. त्याने वैद्यकीय व्यवसाय बंद करुन संपूर्ण लक्ष मुलावर केंद्रीत केले. पिता-पुत्राच्या या जोडीने मोजक्या पैशांमध्ये बुद्धिबळासाठी जगभरात भ्रमन केले. जेव्हा गुकेश ग्रॅण्ड मास्टरचा किताब मिळवण्याचा शेवटच्या टप्प्यात होता, तेव्हा त्याची आई घरखर्च सांभाळत होती. कारण वडिलांनी वैद्यकीय व्यवसायही सोडला होता.
गुकेश याच्याकडे बुद्धिबळसाठी जेव्हा कोणी प्रायोजक नव्हता तेव्हा त्याला मिळालेली पुरस्काराची रक्कम आणि क्राउड फंडिंगमधून (जनतेकडून निधी मिळवणे) आर्थिक वाट काढली. अनेक आव्हानानंतर मागील वर्षी भारताचे नंबर वन बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंदचा पुढे गुकेश मागील वर्षी गेला. गुकेशने बुद्धिबळासाठी नियमित शाळेत जाणेही थांबवले होते.
18 वर्षीय गुकेश चेन्नईत राहणार आहे. चेन्नई देशाच्या बुद्धिबळाची राजधानी म्हणून ओळखले जाते. देशभरात जे चॅम्पियन झाले, ते या शहरातून झाले आहे. गुकेश परिवारात यापूर्वी बुद्धिबळ खेळणारा कोणीही खेळाडू नव्हता. त्याने बुद्धिबळाची सुरुवात घरात अनौपचारिक खेळातून केली. आपल्या घरात बुद्धिबळाचा श्रीगणेशा करत पाया पक्का केला. चांगल्या बुद्धिबळ खेळाडूची प्रतिभा त्याच्यात लहानपणापासून दिसत होती. आई-वडिलांनी त्याची क्षमता ओळखून त्याचे प्रशिक्षण सुरु केले. त्याला शाळेतून नेहमी प्रोत्साहन मिळाले. शाळेत असताना त्याने ग्रँडमास्टरचा किताब मिळवला होता.