मुंबई – राजकोट (Rajkot) येथे चौथ्या टी20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 82 धावांनी विजय मिळविला. मॅचमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यानंतर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सामनावीर दिनेश कार्तिकशी (Dinesh Karthik) संवाद साधला. त्यावेळी माजी कर्णधार एमएस धोनीला बाबत दिनेश कार्तिक म्हणाला की, स्वत:च्या खेळापेक्षा संघाला काय अपेक्षित आहे, यावर लक्ष केंद्रीत करायला हवे असं सांगितलं. दोघांच्या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. “माझ्या सुरुवातीच्या काळात मी माही भाईला एक प्रश्न विचारला होता. मी त्याला विचारले की तो दबावाच्या काळात कसा खेळतो. त्यावेळी त्याने मला एक साधा सल्ला दिला होता. तुमच्या स्वतःच्या स्कोअरबद्दल विचार करणे थांबवा आणि तुमच्या संघाला काय हवे आहे याचा विचार करा’. अगदी सुरुवातीपासूनच, हा धडा माझ्या मनात अडकला आहे. मी आता ज्या प्रकारचा खेळाडू आहे ते बनण्यास मला मदत केली” असल्याचे कार्तिकने सांगितले.
In-flight insightful conversation ?
Learning from the great @msdhoni ?
Being an inspiration ? हे सुद्धा वाचाDO NOT MISS as @hardikpandya7 & @DineshKarthik chat after #TeamIndia‘s win in Rajkot. ? ? – By @28anand
Full interview ?️? #INDvSA | @Paytmhttps://t.co/R6sPJK68Gy pic.twitter.com/wx1o9dOPNB
— BCCI (@BCCI) June 18, 2022
टी-20 पहिले अर्धशतक झळकावणारा दिनेश कार्तिक सामना संपल्यानंतर मैदानावर बसला आणि हार्दिक पांड्या त्याची मुलाखत घेतली. त्यावेळी तिथं अनेक गोष्टींचा उलघडा झाला. सध्या सुरू असलेल्या मालिकेत पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या दोन क्रिकेटपटूंच्या संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. मुलाखतीदरम्यान हार्दिकने कार्तिकला त्याची अर्धशतकी खेळी आणि भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत अनेक प्रश्न विचारले आहेत.
मुलाखतीदरम्यान हार्दिकने त्याच्या मानसिकतेबद्दल कार्तिकला प्रश्न विचारला. त्यावेळी कार्तिक म्हणाला, ‘मध्यम फळीतील फलंदाजाला परिस्थितीनुसार वेगवेगळ्या वेळेला वेगळ्यावेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. तुम्ही कोणाला टार्गेट करता आणि तुमचा डाव कसा पुढे कसा न्यायचा हे तुम्हाला कळलं पाहिजे. मॅच रंगात आल्यानंतर मला कळलं की पुढे काय करायचं? ही एक महत्त्वाची भागीदारी होती. मालिकेत 1-2 अशी घसरण झाल्यानंतर बरोबरीत येणे खूप महत्त्वाचे होते असं कार्तिक म्हणाला.
तसेच मी माझ्या खेळीचा आनंद लुटला आहे.