हार्दिक पांड्याची कसून मेहनत, जबरदस्त व्हिडीओ शेअर

| Updated on: Jul 05, 2019 | 5:04 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडूहार्दिक पांड्या लवकरच मैदानात दिसणार आहे. पांड्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिक  पांड्या प्रचंड मेहनत करताना दिसतोय. आशिया चषकात पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या जखमी झाला होता. तेव्हापासून तो भारतीय संघातून बाहेर आहे. येत्या डिसेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर […]

हार्दिक पांड्याची कसून मेहनत, जबरदस्त व्हिडीओ शेअर
हार्दिककडून व्हिडीओ शेअर
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला भारताचा अष्टपैलू खेळाडूहार्दिक पांड्या लवकरच मैदानात दिसणार आहे. पांड्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिक  पांड्या प्रचंड मेहनत करताना दिसतोय.

आशिया चषकात पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या जखमी झाला होता. तेव्हापासून तो भारतीय संघातून बाहेर आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.  मात्र या दौऱ्यासाठीही त्याची निवड झाली नाही. पण हार्दिक पांड्याने आपला कसून सराव सुरु केला आहे. फिटनेस वाढवण्यासाठी पांड्या घाम गाळत आहे. या सरावादरम्यानचा व्हिडीओ पांड्याने शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी स्थान मिळेल अशी आशा पांड्याला होती. पण निवड समिती सध्या कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे पांड्याला तूर्तास विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हार्दिक पांड्याऐवजी त्याचा भाऊ कृणाल पांड्या आता भारतीय संघात दिसणार आहे. भारताच्या टी ट्वेण्टी संघात कृणाल पांड्याला स्थान देण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

टी-20 मालिका

पहिला सामना – 21 नोव्हेंबर

दुसरा सामना – 23 नोव्हेंबर

तिसरा सामना – 25 नोव्हेंबर

कसोटी मालिका

पहिला सामना – 6 डिसेंबर

दुसरा सामना – 14 डिसेंबर

तिसरा सामना – 26 डिसेंबर

चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी