गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी विराट-डिव्हिलियर्स जी बॅट वापरतात, ती कुठे आणि कोणत्या लाकडापासून बनते?

| Updated on: May 21, 2021 | 5:09 PM

तुम्हाला माहित आहे का की, ज्या बॅटने आपले आवडते खेळाडू गगनचुंबी षटकार फटकावतात, त्या बॅट कोणत्या लाकडापासून आणि कुठे बनतात?

गोलंदाजांची धुलाई करण्यासाठी विराट-डिव्हिलियर्स जी बॅट वापरतात, ती कुठे आणि कोणत्या लाकडापासून बनते?
cricket bats
Follow us on

मुंबई : क्रिकेट (Cricket) हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. त्यात भारतीयांच्या क्रिकेट वेडाचं वेगळं उदाहरण देण्याची गरज नाही. अर्थात इंग्रजांनी क्रिकेट सुरू केलं आणि इंग्लंड हेच या खेळाचं घर आहे. पण क्रिकेटला भारतामुळेच ख्याती मिळाली आहे, यात काहीच शंका नाही. देशातील बहुतेक घरात पालक आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी सर्वात आधी क्रिकेटची बॅट खरेदी करतात. यावरुन तुम्ही भारतातील क्रिकेटविषयीची आवड किंवा क्रेझ समजू शकता. (how cricket bats are made, which wood is used for it, difference between English Willow and Kashmiri Willow)

आपल्याकडे मुलांना त्यांच्या बालपणी ज्या बॅट मिळतात, त्या प्लॅस्टिक किंवा सामान्य लाकडापासून बनवलेल्या असतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का की, ज्या बॅटने आपले आवडते खेळाडू गगनचुंबी षटकार फटकावतात, त्या बॅट कोणत्या लाकडापासून आणि कुठे बनतात? भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स ज्या बॅटच्या सहाय्याने गोलंदाजांची धुलाई करतात, त्या बॅटसाठी वापरलेलं लाकूड कुठे मिळतं? हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबत तुम्हाला माहिती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

विलो नावाच्या लाकडापासून क्रिकेट बॅट बनतात

व्यावसायिक क्रिकेटमध्ये वापरल्या जाणार्‍या बॅट्स फक्त एकाच लाकडापासून बनवलेल्या असतात. या लाकडाला विलो (Willow) असं म्हणतात. इंग्लिश विलो (English Willow) आणि काश्मिरी विलो (Kashmir Willow) असे दोन प्रकारचे विलो आहेत. तथापि, मोठे खेळाडू केवळ इंग्लिश विलोपासून बनवलेल्या बॅटचा वापर करतात.

काश्मिरी विलोपासून बनवलेल्या बॅटपेक्षा इंग्लिश विलोपासून बनवलेल्या बॅट अधिक मजबूत आणि गुणवत्तेच्या असतात. त्यामुळेच अनेक दिग्गज खेळाडू हाय क्लास क्रिकेटमध्ये इंग्लिश विलोपासून बनवलेल्या बॅटचा वापर करतात. तसेच काश्मिरी विलो बॅटच्या तुलनेत इंग्लिश विलो बॅट खूप महाग असतात. चला तर मग जाणून घेऊयात की, इंग्लिश विलो आणि काश्मिरी विलोमध्ये काय फरक आहे. त्याचप्रमाणे बॅट बनवण्यासाठी मिळणारं हे विलो लाकूड कुठे मिळतं.

इंग्लिश आणि काश्मिरी विलोमध्ये फरक काय?

इंग्लिश आणि काश्मिरी विलोमधील फरक जाणून घेण्यापूर्वी, विलोबाबतच्या काही विशेष गोष्टी जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. क्रिकेट बॅट बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विलोला Salix Alba म्हणतात. Salix Alba मोठ्या प्रमाणात युरोपमध्ये आढळतात, विशेषत: ब्रिटनमध्ये. याशिवाय ते आशियातील बर्‍याच भागात आढळतात. त्याची झाडे 10 मीटर ते 30 मीटर उंच असतात.

आता जाणून घेऊयात की, इंग्लिश आणि काश्मिरी विलोमध्ये काय फरक आहे. काश्मिरी विलोपेक्षा इंग्लिश विलोचा रंग थोडा फिकट असतो. इंग्लिश विलोमध्ये काश्मिरी विलोपेक्षा अधिक ग्रेन असते. जे स्पष्टपणे दिसतात. या व्यतिरिक्त दोघांच्या वजनातही मोठा फरक आहे. काश्मिरी विलोपेक्षा इंग्लिश विलो हलक्या असतात. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे काश्मिरी विलोमध्ये अधिक घनता आणि ओलावा आहे.

या बॅट प्रामुख्याने इंग्लंडमध्ये बनतात, तसेच भारतातही अशा बॅटचे कारखाने आहेत. हे कारखाने इंग्लंडमधून लाकूड आयात करतात आणि भारतातच शानदार बॅट तयार करतात.

इतर बातम्या

IPL च्या उरलेल्या 31 मॅचचं वेळापत्रक तयार, 29 तारखेला BCCI मोठी घोषणा करणार?

सौदी अरेबियाची मॉडेल ते इरफान पठाणची बायको, पहा किती झाला बदल?

Video : खोटं बोलणाऱ्या युजवेंद्र चहलची बायकोकडून पोलखोल, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

(how cricket bats are made, which wood is used for it, difference between English Willow and Kashmiri Willow)