पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आजम बऱ्याच काळापासून खराब फॉर्मचा सामना करत होता. त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. एक-एक रन्ससाठी त्याचा संघर्ष सुरु होता. नव्या वर्षात त्याने त्याची बॅट बदलली. सोबतच त्याचं नशीबही बदललं. त्याला त्याचा हरवलेला फॉर्म सापडला. सोबत कमाई सुद्धा वाढली. बाबर आजमने नव्या बॅटने एकाच दिवसात दोन अर्धशतक झळकावली होती. तुम्ही विचार करत असाल, अशी ही कुठली बॅट आहे? ज्यामुळे बाबर आजमच्या करिअरमध्ये चांगले दिवस आलेत. याचं उत्तर आहे, सीए स्पोर्ट्स, कधी काळी पाकिस्तानी दिग्गज क्रिकेटपटू इंजमाम-उल या बॅटने खेळायचा.
बाबर आजम आणि यूकेची बॅट बनवणारी कंपनी ग्रे निकल्स यांच्यामधील करार 30 डिसेंबरला संपला. त्यांनी बाबर आजमसोबतची स्पॉन्सरशिप कन्टिन्यू केली नाही. म्हणून बाबर आजमने पाकिस्तानी ब्रांड सीए स्पोर्ट्ससोबत करार केला. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्नुसार सीए स्पोर्ट्सकडून दरवर्षी बाबर आजमला 7 कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी ग्रे निकल्सकडून 5 कोटी रुपये मिळायचे. म्हणजे कमाईमध्ये 2 कोटींची वाढ झाली आहे. बॅट स्पॉन्सरशिपच्या दृष्टीने पाकिस्तानी क्रिकेटच्या इतिहासातील ही मोठी डील आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्नुसार बाबर सोबत डील होताच अचानक या बॅटची विक्री वाढली आहे.
स्पेशल डीलचा अजून खुलासा नाही
सीए स्पोर्ट्स आणि बाबर आजममध्ये एक स्पेशल डील सुद्धा झाली आहे. रिपोर्ट्नुसार फिफ्टी आणि सेंच्युरी झळकवण्यासाठी बाबर आजमला वेगळे पैसे मिळणार आहेत. या अमाऊंटचा अजून खुलासा झालेला नाही. या ब्रँडशी जोडल्याचा परिणाम बाबरवर दिसून येतोय. त्याचं नशीब अचानक पालटलं आहे. बाबर आजम मागच्या दोन वर्षांपासून खराब फॉर्मचा सामना करत होता. नवीन वर्षात केपटाऊनमध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळला. या मॅचमध्ये पाकिस्तानच्या या स्टार खेळाडूने नव्या बॅटने एकाच दिवसात दोन अर्धशतक झळकावली. बाबरने पहिल्या इनिंगमध्ये 58 रन्स आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 81 धावा केल्या. पण तो आपल्या टीमला पराभवापासून वाचवू शकला नाही.