Ind vs Aus : गाबा टेस्ट बदलली वनडे मॅचमध्ये, टीम इंडियाला विजयाची संधी ऑस्ट्रेलियाने दिलं टार्गेट

| Updated on: Dec 18, 2024 | 10:20 AM

Ind vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन येथे सुरु असलेला कसोटी सामना रंगतदार बनला आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीजचा हा तिसरा सामना आहे. हा कसोटी सामना रंगतदार वळणावर आहे. दोन्ही टीम्सना विजयाची समसमान संधी आहे. पावसामुळे ही कसोटी रंगतदार बनली आहे.

Ind vs Aus : गाबा टेस्ट बदलली वनडे मॅचमध्ये, टीम इंडियाला विजयाची संधी ऑस्ट्रेलियाने दिलं टार्गेट
Team India
Image Credit source: PTI
Follow us on

ब्रिस्बेन येथे बॉर्डर-गावस्कर सीरीजमधील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील हा कसोटी सामना रंगतदार बनला आहे. आज गाबा कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस आहे. काल चौथ्या दिवशी टीम इंडिया फॉलोऑनच्या सावटाखाली होती. पण जसप्रीत बुमराह आणि आकाश दीपने झुंजार फलंदाजी करुन टीम इंडियाला फॉलोऑनच्या संकटातून बाहेर काढलं. त्यांची ही खेळ टीमच्या अन्य सहकाऱ्यांमध्ये जोश भरण्यासाठी पुरेशी होती. आज पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कालच्या धावसंख्येत आणखी आठ धावांची भर घालून टीम इंडियाचा डाव 260 धावांवर आटोपला. आकाश दीप 31 धावांवर आऊट झाला, तर जसप्रीत बुमराह 10 धावांवर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना 185 धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. 89 धावात ऑस्ट्रेलियाचे 7 विकेट पडले होते. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन पॅट कमिन्सने सर्वाधिक 22 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन, मोहम्मद सिराज आणि आकाश दीपने प्रत्येकी 2-2 विकेट काढल्या. ऑस्ट्रेलियाने त्यांचा डाव 89 धावांवर घोषित केला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर भारताला विजयासाठी 275 धावांच टार्गेट दिलं आहे.

सामना रोमांचक स्थितीत

टीम इंडियाने पर्थ कसोटी जिंकून मालिकेची विजयी सुरुवात केली. पण दुसऱ्या एडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केलं. आता ब्रिसबेनमध्ये गाबा येथे तिसरी कसोटी सुरु आहे. पहिल्या तीन दिवसाच्या खेळात मजबूत स्थितीत असलेली ऑस्ट्रेलिया आता सहज विजयापासून खूप लांब गेली आहे. टीम इंडियाने फॉलोऑन टाळून सामन्याला अजून रोमांचक बनवलं आहे. ब्रिस्बेन क्रिकेट स्टेडियममधील या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. दोन दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला.

21 वर्षानंतर दिसू शकतं असं दृश्य

भारत-ऑस्ट्रेलियामधील हा सामना ड्रॉ झाला, तर 21 वर्षानंतर प्रथमच गाबामधील कसोटी सामना अनिर्णीत राहीलं. दोन्ही टीम्समध्ये या ठिकाणी खेळल्या गेलेल्या 7 कसोटीपैकी 5 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. एका मॅचमध्ये टीम इंडियाला विजय मिळाला आहे. 2003 साली गाबा कसोटी अनिर्णीत राहिली होती.