Jasprit Bumrah Bowling Action : ऑस्ट्रेलियात जसप्रीत बुमराहवर मोठा आरोप, रडीचा डाव सुरु

| Updated on: Dec 24, 2024 | 1:23 PM

Jasprit Bumrah Bowling Action : टीम इंडियाचा उप कर्णधार जसप्रीत बुमराह सध्या क्रिकेट विश्वातील नंबर 1 टेस्ट बॉलर आहे. सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्या गोलंदाजीचा ऑस्ट्रेलियन टीमने धसका घेतला आहे. आता मेलबर्नमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीआधी जसप्रीत बुमराहच्या बाबतीत एक मोठी मागणी करण्यात आली आहे.

Jasprit Bumrah Bowling Action : ऑस्ट्रेलियात जसप्रीत बुमराहवर मोठा आरोप, रडीचा डाव सुरु
Jasprit Bumrah
Image Credit source: PTI
Follow us on

टीम इंडियाचा टॉप बॉलर जसप्रीत बुमराहने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या नाकीनऊ आणले आहेत. जसप्रीत बुमराहला खेळणं ऑस्ट्रेलियन फलंदाजांना झेपत नाहीय. त्याने एकट्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजीच कंबरड अनेकदा मोडलं आहे. आतापर्यंत तीन कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने 20 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. सध्याच्या घडीचा नंबर 1 टेस्ट बॉलर बुमराह ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या तालावर नाचवतोय. ऑस्ट्रेलियाचे अनेक दिग्गज त्याच्या गोलंदाजीचे फॅन झाले आहेत. पण मेलबर्नमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीआधी जसप्रीत बुमराहवर त्याची बॉलिंग Action अवैध असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मेलबर्न कसोटी आधी जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग Action वरुन वाद सुरु झाला आहे. त्याच्या बॉलिंग एक्शनवर ऑस्ट्रेलियाचा अनुभवी क्रिकेट प्रसारक इयान मॉरिसने प्रश्नचिन्ह निर्माण केलय. “कोणीही भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर प्रश्न का उपस्थित केला नाही?. मी असं म्हणत नाही की, तो थ्रो गोलंदाजी करतो. पण कमीत कमी चेंडू टाकताना हाताच्या स्थितीच विश्लेषण करणं गरजेच आहे” असं इयान मॉरिसने एक्सवर म्हटलं आहे.


आधाही या स्थितीचा सामना केलाय

जसप्रीत बुमराहच्या बॉलिंग Action वर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीमुळे त्याला या स्थितीचा सामना करावा लागला आहे. बुमराहने पर्थ टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे पाच विकेट काढले. त्यांचा डाव 104 धावांवर आटोपला. त्यावेळी सुद्धा बुमराहच्या बॉलिंग Action वरुन सोशल मीडियावर वादविवाद झालेला.


बुमराहने कुठल्या भारतीय गोलंदाजाचा रेकॉर्ड मोडला?

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या तीन कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने 6 इनिंगमध्ये 21 विकेट काढलेत. गाबा टेस्ट दरम्यान ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर बनला. आतापर्यंत ऑस्ट्रेलियात 20 इनिंगमध्ये त्याच्या नावावर 53 विकेट आहेत. बुमराहने या बाबतीत दिग्गज भारतीय गोलंदाज कपिल देवचा रेकॉर्ड मोडला. कपिल देव यांच्या नावावर ऑस्ट्रेलियात टेस्टमध्ये सर्वाधिक 51 विकेट काढण्याचा रेकॉर्ड होता.