IND vs AUS : टीम इंडियाने गाबामध्ये करून दाखवलं, आता कांगारूंना इतिहास रचण्याची नामी संधी

| Updated on: Feb 15, 2023 | 4:33 PM

कांगारू त्यांच्या गाबाच्या मैदानावर जसे अजिंक्य होते तशाप्रकारे भारतीय संघाने कोटलाच्या मैदानावर आपली बादशाहत कायम ठेवली आहे.

IND vs AUS : टीम इंडियाने गाबामध्ये करून दाखवलं, आता कांगारूंना इतिहास रचण्याची नामी संधी
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुसरा कसोटी सामना दोन दिवसात म्हणजेच 17 फेब्रुवारीला होणार आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या या सामन्यामध्ये भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहिलात कांगारूंसाठी फार अवघड ठरणार आहे. मालिकेमध्ये भारतीय संघाने 1-0 ने आघाडीे घेतली आहे. नागपूरमधील कसोटी सामना भारताने 1 डाव 132 धावांनी जिंकला होता. दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत आघाडी बळकट करण्याचं रोहित अँड कंपनीचं लक्ष्य असणार आहे. भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहता कांगारूंसाठी हा कसोटी सामना अवघड ठरणार आहे. कांगारू त्यांच्या गाबाच्या मैदानावर जसे अजिंक्य होते तशाप्रकारे भारतीय संघाने कोटलाच्या मैदानावर आपली बादशाहत कायम ठेवली आहे.

भारतीय संघाचा दिल्लीच्या मैदानावर शेवटचा पराभव 1987 मध्ये झाला होता. वेस्ट इंडिज संघाने भारताचा त्यावेळी पराभव केला होता. 25 नोव्हेंबर 1987 पासून सुरू झालेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव 75 धावांवर आटोपला होता. भारतीय गोलंदाजांनीही कॅरेबिअन संघाला 127 धावात गुंडाळलं होतं.

दुसऱ्या डावात तत्कालीन भारताचे कर्णधार दिलीप वेंगसकर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताच्या 327 धावा झाल्या होत्या. मात्र कर्णधार व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी नाबाद शतक करत 276 धावांचं लक्ष्य पूर्ण करत विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर आजतागायत टीम इंडिया अजिंक्य राहिली आहे.

2017 साली श्रीलंका आणि भारतामध्ये झालेल्या कसोटी सामन्यामध्ये विराट कोहली याने द्विशतक केलंस होतं. मात्र हा सामना अनिर्णित झाला होता. विराट त्यावेळी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत होता. 287 चेंडूत विराटने 243 धावा केल्या होत्या. मुरली विजयनेही 155 धावांची दमदार खेळी केली होती. या मैदानावर आतापर्यंत 34 कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी यजमान संघाने 13 जिंकले आहेत, तर 6 सामने गमावले आहेत. तर 15 सामने ड्रॉ झाले आहेत.

दरम्यान, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून कधी काय होईल काही सांगता येत नाही. मात्र रेकॉर्ड पाहता कांगारूंच्या संघावर दबाव असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सामन्यामध्ये कांगारूंना 1 डावाने पराभव करत जबरदस्त सुरूवात केली आहे.

दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुहमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल , कुलदीप यादव , रवींद्र जडेजा , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज आणि उमेश यादव.