विराटच्या वाटेला जाऊ नका; स्टीव्ह वॉचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना इशारा

| Updated on: Nov 06, 2020 | 3:40 PM

भारतीय क्रिकेट संघ आयपीएल संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाचा हा दौरा 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.

विराटच्या वाटेला जाऊ नका; स्टीव्ह वॉचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंना इशारा
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ आयपीएल (Indian Premier League) संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (india tour of australia 2020) जाणार आहे. टीम इंडियाचा (Team India) हा दौरा 27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. उभय संघांमध्ये सुरुवातीला एकदिवसीय मालिका, नंतर टी-20 मालिका आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांचा जुना इतिहास पाहिला तर लक्षात येईल की, या मालिकेत दोन्ही संघांच्या खेळांडूंमध्ये बॅट आणि बॉलच्या सहाय्याने युद्ध होणार आहेच, सोबत शाब्दिक युद्धदेखील पाहायला मिळू शकतं. (Steve Waugh warns Australian cricket team, says don’t sledge Virat Kohli)

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये शाब्दिक युद्ध होऊ शकतात, या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ (Steve Waugh) याने ऑस्ट्रिलयन संघाला सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. स्टीव्ह वॉ याने कांगारुंच्या संघाला सल्ला देताना म्हटले आहे की, भारताविरुद्धच्या आगामी क्रिकेट मालिकांमध्ये खेळताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला डिवचणं, त्याच्यावर शाब्दिक बाणांनी हल्ला करणं आपल्यावरच उलटू शकतं.

स्टीव्ह वॉ म्हणाला की, क्रिकेट सामन्यांदरम्यान विराट कोहलीला स्लेज करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याच संघावर भारी पडेल. स्लेजिंगच्या विराटवर पॉझिटिव्ह परिणाम होऊ शकतो. कदाचित स्लेजिंग केल्यामुळे विराट अधिक जोशात खेळू शकतो. स्वीव्ह वॉच्या मते केवळ विराटच नव्हे तर त्याच्या संघातील इतर खेळाडूंनादेखील स्लेज करुन चालणार नाही.

स्टीव्ह वॉ याने ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ऑस्ट्रेलियन संघाला विराटपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. स्लेजिंगचा विराट कोहलीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. कोणत्याही महान खेळाडूला याने काहीही फरक पडत नाही. अशा खेळाडूंना तुम्ही जितकं एकटं सोडाल तितकं चांगलं. स्लेजिंग करुन तुम्ही त्याला अजून उत्तम खेळण्यास प्रवृत्त कराल. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियन संघाला सल्ला देईन की, त्यांनी विराटला काहीही बोलू नये.

मागील वेळी जेव्हा भारतीय क्रिकेट संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला गेला होता, तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा चार कसोटी सामन्यांची मालिका भारताने 2-1 अशी जिंकली होती.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 डिसेंबर – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 डिसेंबर – ब्रिस्बेन

संबंधित बातम्या

India Tour Australia | ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हिटमॅन’ संघाबाहेर

IND vs AUS : के एल राहुलचं प्रमोशन, टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची धुरा

India Tour Australia | आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाकडून संधी

(Ind VS AUS : Steve Waugh warns Australian cricket team says dont sledge Virat Kohli)