IND vs BAN : भारतीय संघ उद्या बांगलादेश विरुद्ध पहिला वनडे (Ind vs Ban First ODI) सामना खेळणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडिया या पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहे. मीरपूरमध्ये होत असलेल्या या वनडे सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार सकाळी 11:30 वाजता होणार आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन (Rohit and Dhawan) ओपनिंग करु शकतात. तर विराट कोहलीच्या कामगिरीकडे देखील लक्ष लागलं आहे.
मीरपूर वनडेसाठी (Mirpur ODI) रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांची संघात वापसी झाली असून पहिला सामना जिंकण्यासाठी ते सज्ज आहेत. शेरे बांग्ला स्टेडियममध्ये हा पहिला सामना रंगणार आहे.
बांगलादेश विरुद्ध पहिल्या वनडेसाठी रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली (Virat Kohli) हे टॉप ऑर्डर खेळाडू असतील. 2019 वर्ल्ड कपनंतर या तिघांनी एकत्र फक्त 12 वनडे सामनेच खेळले आहेत. त्यामुळे या तिन्ही खेळाडू्ंच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.
केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्यावर देखील मीडल ऑर्डरची जबाबदारी असणार आहे. ऋषभ पंत (Rishabh pant) देखील एक चांगला पर्याय आहे. जो रन करु शकतो. त्यामुळे या तिन्ही खेळाडूंची कामगिरी कशी आहे. यावर त्यांचं पुढचं भवितव्य निश्चित होईल.
अक्षर पटेल (Akshar Patel) आणि वॉशिंगटन सुंदर (Washington Sunder) ही स्पीनर जोडी भारतीय संघात असणार आहे. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप आणि उमरान मलिक देखील मोठे दावेदार आहेत. मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर झाल्याने मलिकला संधी मिळाली आहे. त्यामुळे भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध कशी कामगिरी करतो. याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.