Ruturaj Gaikwad : ‘लाज वाटली पाहिजे’, ऑस्ट्रेलियातून ऋतुराज गायकवाडने इतके टोकाचे शब्द का वापरले?

| Updated on: Nov 08, 2024 | 9:50 AM

Ruturaj Gaikwad : महाराष्ट्राचा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या ऑस्ट्रेलियात आहे. तिथे तो इंडिया ए च नेतृव करतोय. ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियातून एका घटनेवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. त्याने थेट 'लाज वाटली पाहिजे' असं म्हटलं आहे.

Ruturaj Gaikwad : लाज वाटली पाहिजे, ऑस्ट्रेलियातून ऋतुराज गायकवाडने इतके टोकाचे शब्द का वापरले?
ruturaj gaikwad
Image Credit source: AFP
Follow us on

टीम इंडियाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या मेलबर्नमध्ये आहे. ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध तो इंडिया ए च नेतृत्व करतोय. कॅप्टन म्हणून ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियात खूपच खराब प्रदर्शन केलय. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऋतुराज गायकवाड 4 रन्स बनवून आऊट झाला. ऋतुराज गायकवाड आऊट ऑस्ट्रेलियात झाला. पण भारतात सुरु असलेल्या रणजी सामन्यातील एका निर्णयावर तो भडकला. गायकवाडने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. महाराष्ट्र आणि सर्विसेजमध्ये रणजी सामना सुरु आहे. या मॅचमध्ये अंकित बावनेला आऊट देण्याच्या निर्णयावर गायकवाड भडकला. महाराष्ट्राच्या टीमने पहिल्या इनिंगमध्ये सर्विसेज विरुद्ध 185 धावा केल्या. महाराष्ट्राचा कॅप्टन अंकित बावनेने 73 धावा केल्या.

बावने मोठी इनिंग खेळू शकला असता, पण एका वादग्रस्त निर्णयाचा तो बळी ठरला. बावने 50 व्या ओव्हरमध्ये अमित शुक्लाच्या चेंडूवर आऊट झाला. स्लिपमध्ये त्याची कॅच पकडली. रिप्ले पाहिल्यानंतर ही कॅच नसल्याच स्पष्ट झालं. चेंडू स्लिपमधल्या फिल्डरच्या हातापर्यंत पोहोचण्याआधी टप्पा पडला होता. मात्र, तरीही बावनेविरोधात अपील झालं आणि अंपायरने त्याला आऊट दिलं. अंकीत बावनेला अशा प्रकारे बाद देण्यावर गायकवाडने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली. यामध्ये त्याने बावनेच्या विकेटचा रिप्ले प्ले केला. सोबतच लिहिलं, “एका लाइव्ह मॅचमध्ये तुम्ही अशाप्रकारे आऊट कसं देऊ शकता. या कॅचच्या अपीलवर लाज वाटली पाहिजे”


गायकवाडचा ऑस्ट्रेलियात परफॉर्मन्स कसा?

ऋतुराज गायकवाडचा ऑस्ट्रेलियात खूप खराब परफॉर्मन्स आहे. ऑस्ट्रेलियन विकेट्सवर धावांसाठी त्याला संघर्ष करावा लागतोय. इंडिया ए चा कॅप्टन पहिल्या मॅचमध्ये शुन्य आणि पाच रन्सवर आऊट झाला. दुसऱ्या अनिधिकृत टेस्टच्या पहिल्या डावात त्याने फक्त 4 धावा केल्या. गायकवाडला टीम इंडियात पुनरागमन करायचं असेल, तर ऑस्ट्रेलियन विकेट्सवर त्याला मोठी खेळी करावी लागेल.