भारतीय क्रिकेटपटू राहुल चाहरचे वडील देशराज सिंह चाहर यांच्या फसवणुकीच प्रकरण समोर आलय. रिपोर्ट्नुसार एका बिल्डरने त्यांना 26.50 लाख रुपयांना फसवलं. सोबतच जीवे मारण्याची धमकी दिली. आता या प्रकरणात त्यांनी तक्रार नोंदवली आहे. नरसी विलेजचे मालक वासुदेव गर्ग, अरुण गुप्ता आणि पीयुष गोयल यांनी एका जमिनीवर घर बांधून देण्यासाठी पैसे घेतले होते. पण 12 वर्षानंतरही रजिस्ट्रेशन केलेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. राहुल चाहरच्या वडिलांनी कंपनीशी संबंधित तीन लोकांवर हत्येची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. 12 वर्षापासून या प्रकरणामुळे मी त्रस्त आहे, देशराज सिंह चाहर यांनी सांगितलं. हिंदुस्तानच्या रिपोर्ट्नुसार, जमिनीची नोंदणी करण्याच्या मागणीसाठी शेवटचे ते 5 जून 2024 रोजी अरुण गुप्ता आणि पीयूष गोयल यांना भेटले. त्यावेळी दोघांनी शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणात राहुल चाहर यांच्या वडिलांना आग्राच्या डीसीपीने सुद्धा साथ दिली. राहुल चाहर यांच्या वडिलांकडे घरासाठी पैसे दिल्याचे पुरावे आहेत. त्याच आधारावर तक्रार नोंदवण्यात आली आहे. पुराव्याच्या आधारावर तपास करुन कारवाई केली जाईल असं डीसीपी सिटी सूरज कुमार राय यांनी सांगितलं. राहुल चाहरचे वडील देशराज सिंह चाहर यांनी या प्रकरणी मे 2024 मध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. बिल्डर प्लांटवर घर द्यायला तयार झाला नाही, तेव्हा गुन्हा नोंदवला. राहुलच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार कंपनीचे मालक वासुदेव गर्ग यांनी नरसी विलेज नावाची कॉलनी बनवलीय. या कॉलनीमध्ये 2012 साली त्यांना दोन प्लॉट बुक केले. त्यावर कंपनी घर बांधून देणार होती. बिल्डरने यामध्ये एक प्लॉट 2016 मध्ये कोणा दुसऱ्यालाच विकला.
किती लाख दिले?
राहुलच्या वडिलांना याची माहिती मिळताच त्यांनी वासुदेव गर्ग यांच्याकडे जमा केलेले पैसे मागितले. ते पैसे त्यांना मिळाले. त्यानंतर देशराज सिंह यांनी दुसरा प्लॉट मुलगा राहुल चाहरच्या नावावर ट्रान्सफर करण्यासाठी 2018 साली अर्ज दिला. त्यासाठी 32 हजार रुपये ट्रान्सफर फी घेतली. प्लॉटवर घर बांधण्यासाठी उरलेले 26.50 लाख रुपये सुद्धा दिले. त्यावर घर बांधल्यानंतरही वासुदेव गर्ग यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही. बिल्डर प्लॉटप्रमाणे घर सुद्धा दुसऱ्याला विकण्याच्या तयारीत आहे, असा त्यांचा आरोप आहे.