एशिया कप हॉकी (Asia Cup Hockey tournament) टुर्नामेंटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या (India Vs Pakistan)मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत थरार रंगला. शेवटच्या 70 सेकंदात पाकिस्तानने (Pakistan goal)केलेल्या गोलमुळे ही मॅच 1-1 अशी बरोबरीने संपली. पाकिस्तानच्या अब्दुल राणाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत, ही मॅच भारताच्या हातात जाऊ दिली नाही. टीम इंडियाकडून एकमात्र गोल कार्ती सेल्वम याने नोंदवला. पहिला हाफमध्ये भारतीय टीमने दोन पेनल्टी कॉर्नरची संधी गमावली. मात्र तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत कार्तीने 9 व्या मिनिटांत गोल करत भारताला 1-0 अशी बढत मिळवून दिली होती. आता टीम इंडियाचा पुढील मुकाबला 24 मे रोजी जपान आणि 26 मे रोजी इंडोनेशियाशी होणार आहे.
Full-time! India made every effort in their first match against Pakistan, but they were tied at the end of Quarter 4. Looking forward to India’s more energetic approach.
?? 1-1 ??#IndiakaGame #HockeyIndia #HeroAsiaCup #INDvsPAK @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/1A2P3hfncB हे सुद्धा वाचा— Hockey India (@TheHockeyIndia) May 23, 2022
यापूर्वी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताने दिली होती पाकिस्तानला मात
यापूर्वी 21 डिसेंबर 2021 रोजी खेळवण्यात आलेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानचा 4-3 ने पराभव केला होता. बीरेंद्र लाकडा याच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्सशिपच्या या वर्षातील स्पर्धेची सुरुवात विजयाने करु इच्छित होती. मात्र असे होऊ शकले नाही. शेवटच्या 70 सेकंदांनी भारतीय टीमचा घात केला. सध्या भारतीय हॉकी टीमच ही टूर्नामेंट जिंकेल यासाठी फेव्हरेट मानण्यात येत आहे.
Hockey India congratulates these following players for earning their respective debuts during the first match of the Hero Asia Cup against Pakistan on Monday 23rd of May, 2022.#IndiaKaGame #HockeyIndia #HeroAsiaCup #INDvsPAK @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/I1gGTvHaaE
— Hockey India (@TheHockeyIndia) May 23, 2022
भारत आणि पाकिस्तान यांची टूर्नामेंट जिंकण्यात बरोबरी
ही टुर्नामेंट आत्तापर्यंत जिंकण्यात भारत आणि पाकिस्तान यांची बरोबरी आहे. दोन्ही टीमच्या नावावर तीन–तीन विजयांची नोंद आहे. भारताने 2003,2007 आणि 2017 साली ही टुर्नामेंट जिंकलेली आहे. तर 1982, 1985, 1994, 2013 साली फायनलमध्ये पराभव स्वीकारला आहे. आजची मॅच ही भारत आणि पाकिस्तानमधील १७८ वी मॅच होती.