सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (Indian Tour Australia) सिडनीमध्ये कसून सराव करत आहे. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. मोहम्मद शमी (Mohammed Shami)आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे टीम इंडियाचे प्रमुख गोलंदाज आहेत. वनडे आणि टी 20 च्या तुलनेत ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका प्रतिष्ठेची समजली जाते. या कसोटी मालिकेत बुमराह आणि शमीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या दोघांना कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करता यावी, यासाठी या दोघांना एकदिवसीय आणि टी 20 मालिकेतील काही सामन्यांमधून विश्रांती देण्यात येऊ शकते. India Australia 2020 Will Mohammad Shami and Jaspreet Bumrah get a break from ODIs and T20s to prepare for the Test series
एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यानंतर टीम इंडिया टी 20 मालिका खेळणार आहे. टी 20 नंतर 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.
“बुमराह आणि शमी सातत्याने क्रिकेट खेळताहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर सातत्याने खेळण्याबाबतचा वर्कलोड आहे. टीम मॅनेजमेंट या वर्कलोडबद्दल जागृत आहे. दुसऱ्या बाजूला इशांत शर्मा अजूनही पूर्णपणे दुखापतीतून सावरला नाही. इशातं कसोटी मालिकेआधी दुखापतीतून सावरेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. मात्र जर दुर्देवाने इशांत सावरला नाही, तर कसोटी मालिकेत सर्व जबाबदारीही शमी-बुमराहवर येईल. तसेच कसोटीच भरीव कामगिरी करता यावी, या उद्देशाने या दोघांना एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात येऊ शकते. किंवा या दोघांना एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत आलटून पालटून खेळवले जाऊ शकते”, अशी माहिती बीसीसीआयच्या काही सूत्रांनी पीटीआयला दिली आहे.
“इशांतच्या दुखापतीमुळे टीम मॅनेंजमेंट चांगलीच खबरदार झाली आहे. त्यामुळे इशांतसारखंच इतर कोणत्या खेळाडूला दुखापत होऊ नये, यासाठी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण दोघेही शमी आणि बुमराहबद्दल अधिक काळजी घेत आहेत”, अशीही माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला दिली.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा मागील दौऱ्यात कसोटी मालिकेत 2-1 च्या फरकाने पराभव केला होता. या कसोटी मालिकेत मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या जोडीने पावरफुल कामगिरी केली होती. या कसोटी मालिकेत बुमराहने 21 तर शमीने 16 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
कसोटी (टेस्ट) मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडिलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडिलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
संबंधित बातम्या :
IND vs AUS | अॅडिलेडमध्ये कोरोनाने डोकं वर काढलं, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीचं काय होणार?
India Australia 2020 Will Mohammad Shami and Jaspreet Bumrah get a break from ODIs and T20s to prepare for the Test series