सिडनी : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) शतकी खेळी, डेव्हिड वॉर्नर (Davis Warner), अॅरॉन फिंच (Aron Finch) आणि मार्नस लाबुशानेच्या (Marnus Labuschagne) अर्धशतकी खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn maxwell) फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला (Ind Vs Aus 2020) विजयासाठी 390 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 389 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 104 धावा केल्या तर डेव्हिड वॉर्नरने 83 धावांची खेळी केली. (India vs Austrelia 2020 Austrelia Five Batsman Rocking inning)
टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाची धमाकेदार सुरुवात झाली. डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच या दोघांनी 142 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी मोहम्मद शमीने फोडली. त्यानंतर खेळायला आलेल्या स्टीव्ह स्मिथने चौकारांची आतषबाजी केली. आपल्या शतकी खेळीत त्याने 14 चौकार लगावले तर दोन गगगुचंबी षटकार ठोकले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 62 बॉलमध्ये त्याने शतक खळकावलं होतं. अगदी याच अंदाजात त्याने आजही बॅटिंगला सुरुवात केली. ड्रेसिंग रुममधून सेट होऊन आल्यासारखं त्याने अगदी पहिल्या बॉलपासून आक्रमक फटके मारले. मैदानाच्या चारही कोपऱ्यात त्याने फटके लगावले. कुठलंही दडपण न घेता अगदी सहजपणे तो फटके खेळत होता
मार्नस एलने 61 बॉलमध्ये 70 रन्स फटकावले. या खेळीत त्याने 5 बॉल सीमारेषेपार धाडले. ग्लेन मॅक्सवेलने देखील आपल्या आक्रमक अंदाजात बॅटिंग केली. केवळ 29 बॉलमध्ये 63 धावा कुटल्या. या खेळीला त्याने 4 चौकार आणि 4 षटकारांचा साज चढवला.
मालिकेत दुसऱ्यांदा डेव्हिड वॉर्नर-अॅरॉन फिंच जोडीने शतकी सलामी दिली. कांगारुंच्या ओपनिंग जोडीच्या बहारदार परफॉरमन्सनंतर भारताच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. इतिहासात आतापर्यंत असा विक्रम भारताच्या नावावर नोंदवला गेला नव्हता. भारतीय संघाच्या एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदा घडलीये की सलग तीन मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या ओपनिंग जोडीने शतकी भागीदारी रचली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नर-अॅरॉन फिंच जोडीने पहिल्या विकेटसाठी 156 रन्सची पार्टनरशीप केली. आज तोच कित्ता गिरवत फिंच-वॉर्नर जोडीने 142 रन्सची भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करुन दिली.
अॅरॉन फिंच– 60 रन्स (69 बॉल), 6 चौकार, 1 षटकार
डेव्हिड वॉर्नर– 83 रन्स (77 बॉल), 7 चौकार, 3 षटकार
स्टीव्ह स्मिथ– 104 रन्स (64 बॉल), 14 चौकार, 2 षटकार
मार्नस एल– 70 रन्स (61 बॉल), 5 चौकार, 0 षटकार
ग्लेन मॅक्सवेल– 63 रन्स (29 बॉल), 4 चौकार, 1 षटकार
(India vs Austrelia 2020 Austrelia Five Batsman Rocking inning)
संबंधित बातम्या
India vs Australia 2020 | विराट कोहलीने रचला इतिहास, हा रेकॉर्ड करणारा 9 वा भारतीय खेळाडू