पुणे : टीम इंडियाने इंग्लंडचा तिसऱ्या (india vs england 3rd odi) एकदिवसीय सामन्यात 7 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. कर्णधार विराट कोहली शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. विराटने टीम इंडियाचं नेृत्तव करताना शानदार कारनामा केला आहे. (india vs england 3rd odi 2021 Virat Kohli 200th international matches as captain)
That Winning Feeling ??#TeamIndia beat England by 7 runs in the third & final @Paytm #INDvENG ODI and complete a 2-1 series win. ??
Scorecard ? https://t.co/wIhEfE5PDR pic.twitter.com/mqfIrwJKQb
— BCCI (@BCCI) March 28, 2021
काय आहे कामगिरी?
इंग्लंड विरुद्धचा तिसरा एकदिवसीय सामना हा विराटचा कर्णधार म्हणून एकूण 200 वा सामना होता. विराट कर्णधार म्हणून 200 सामन्यात आपल्या संघाचं नेतृत्व करणारा तिसरा भारतीय तर एकूण 8 वा कर्णधार ठरला आहे.
India WiN ? @imVkohli Thalaiva♥️?#INDvsENG pic.twitter.com/DFhOS2GBCA
— シ︎Mʀ.அஜித்தியன் சூர்யா™☠️? (@AjithiyanSuriya) March 28, 2021
आतापर्यंत महेंद्रसिंह धोनी, रिकी पॉन्टिंग, स्टीफन फ्लेमिंग, ग्रॅमी स्मिथ, एलेन बॉर्डर, अर्जुना रणतुंगा, मोहम्मद अझरुद्दीन यांनी हा पराक्रम केला होता. तर विराट 8 वा कॅप्टन ठरला आहे.
विराटची कर्णधार म्हणून कामगिरी
विराटने आपल्या 200 सामन्यांच्या (एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी) नेतृत्वात एकूण 128 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर 55 मॅचमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तसेच 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर 3 मॅच या बरोबरीत सुटल्या आहेत.
विराटची या मालिकेतील कामगिरी
विराटने या मालिकेतील 3 सामन्यात एकूण 2 अर्धशतकांसह 129 धावा केल्या. विराटने या मालिकेत अनुक्रमे 56, 66 आणि 7 धावांची खेळी केली.
विराटचा शानदार कॅच
इंग्लंडने 200 धावसंख्येवर मोईन अलीच्या रुपात सातवी विकेट गमावली. मात्र त्यानंतर सॅम करन आणि आदिल रशीदने संयमी अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी झाली होती. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत होती.ही जोडी फोडणं टीम इंडिया समोरचं आव्हान होतं. सामन्यातील 40 वी ओव्हर विराटने शार्दुल ठाकूरला टाकायला दिली.
What a catch by the Captain and @imShard picks up his fourth wicket.
Take a bow @imVkohli ?
Live – https://t.co/wIhEfE5PDR #INDvENG @Paytm pic.twitter.com/VpsV5xF3yv
— BCCI (@BCCI) March 28, 2021
या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर रशीदने फटका मारला. रशीदने मारलेला फटका विराटच्या दिशेने गेला. पण विराट आणि चेंडू यांच्यातील अंतर बरेच लांब होतं. पण विराट आपल्या नेहमीच्या शैलीत हवेत झेपावला. चेंडूवर अचूक नजर ठेवत कॅच पकडला.
संबंधित बातम्या :
VIDEO : हवेत झेपावत विराट कोहलीची एक हाती शानदार कॅच, आदिल रशीद तंबूत