टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्याला अवघ्या काही वेळात सुरुवात होणार आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला ही मॅच जिंकणं बंधनकारक असणार आहे. दरम्यान या सामन्यात 3 फलंदाजांना विक्रमी कामगिरी करण्याची संधी आहे.
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t20) रोहित शर्माला (Rohit Sharma) 9 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे.
जेसन रॉय. इंग्लंडच्या जेसन रॉयला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी त्याला अवघ्या 7 धावांची गरज आहे.7 धावा पूर्ण करताच जेसन 7 वा इंग्रज फलंजदाज ठरेल.
डेव्हिड मलान. डेव्हिड आयसीसी टी 20 क्रमवारीतील अव्वल फलंदाज. मलानला टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान 1000 धावा करण्याची संधी आहे. त्यासाठी मलानला 79 धावांची आवश्यकताआहे. मलानने आज ही कामगिरी केली तर तो 22 डावात 1 हजार धावा पूर्ण करेल. यासह तो पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मोडीत काढेल. आझमने 26 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.