IND vs NZ 1st ODI- टीम इंडियाने काल न्यूझीलंड विरुद्ध पहिला वनडे सामना जिंकला. पण त्या विजयामध्ये ती शान नव्हती. 350 धावांचा डोंगर उभारूनही टीम इंडियाने अवघ्या 12 रन्सनी रडतखडत हा सामना जिंकला. उलट न्यूझीलंडच्या टीमच जास्त कौतुक आहे, कारण ते लढून हरले. एकवेळी न्यूझीलंडची अवस्था 28.4 ओव्हरमध्ये 6 बाद 131 होती. इथून न्यूझीलंडची टीम लक्ष्याच्या जवळपास पोहोचेल असा कोणालाही वाटलं नव्हतं. पण ऑलराऊंडर मायकल ब्रेसवेलने कमाल केली. त्याने 78 चेंडूत 140 धावा फटकावल्या. त्याच्यामुळे विजय न्यूझीलंडच्या दृष्टीपथात आला होता. पण हार्दिक पंड्याची 49 वी आणि शार्दुल ठाकूरच्या 50 व्या ओव्हरमधील कामगिरीमुळे न्यूझीलंडचा विजय थोडक्यात हुकला.
लास्ट ओव्हर शार्दुल ठाकूरच्या हाती सोपवली
कॅप्टन रोहित शर्माने लास्ट ओव्हर शार्दुल ठाकूरच्या हाती सोपवली. 6 चेंडूत 20 धावांची गरज होती. ब्रेसवेल ज्या पद्धतीने फटकेबाजी करत होता, ते पाहून त्याच्यासाठी हे फार अवघड नव्हतं. शार्दुलच्या पहिल्याच चेंडूवर ब्रेसवेलने लांबलचक सिक्स मारला. दुसरा चेंडू वाईड टाकला. आता 5 चेंडूत न्यूझीलंडला विजयासाठी 13 धावांची आवश्यकता होती.
You can’t Hit Against Lord Shardul #IndVsNz #ShardulTHAKUR #lordShardul #Mitchell #INDvNZpic.twitter.com/bx8viaGot7
— S. (@SohitPathak_18) January 18, 2023
वादळी खेळी संपुष्टात
शार्दुलने ओव्हरमधील दुसरा चेंडू यॉर्कर टाकला. समोर इनफॉर्म बॅट्समन होता. हा एक धाडसी निर्णय होता. ब्रेसवेल मिडल स्टम्पवर होता. ब्रेसवेलचा फटका खेळण्याचा प्रयत्न चुकला. चेंडू पॅडला लागला. LBW साठी अपील झालं. अंपायरने बाद ठरवलं. अशा प्रकारे टीम इंडियाने 12 धावांनी ही मॅच जिंकली. ब्रेसवेलची 12 चौकार, 10 षटकरांची 140 धावांची वादळी खेळी संपुष्टात आली.
कोणी सांगितलं यॉर्कर लेंग्थ बॉल टाक?
मॅच संपल्यानंतर शार्दुल ठाकूरने अंतिम विकेट घेताना, विराट कोहलीचा सल्ला कसा उपयोगाला आला? ते सांगितलं. “विराट कोहलीने मला यॉर्कर लेंग्थ बॉल टाकायला सांगितलं” असं ठाकूर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला.