केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेत मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना केपटाऊनमध्ये सुरु झाला आहे. सध्या दोन्ही संघ मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत. सेंच्युरियनची पहिली कसोटी भारताने तर जोहान्सबर्गची कसोटी दक्षिण आफ्रिकेने जिंकली आहे. केपटाऊनमध्ये जिंकणारा संघ मालिकाविजेता ठरणार आहे. न्यूलँडस स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारताचा कॅप्टन विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (India vs south Africa For capetown test team india did two changes virat kohli & Umesh yadav are part of playin XI)
केपटाऊन कसोटीत भारतीय संघात दोन बदल झाले आहेत. हनुमा विहारीच्या जागी विराट कोहली संघात परतला आहे. विहारीने जोहान्सबर्ग कसोटीच्या दोन्ही डावात चांगली कामगिरी केली होती. पण तिसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळाली नाही. अजिंक्य रहाणेच्याजागी हनुमा विहारीला संधी मिळाली पाहिजे, त्याला खेळवा असे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचे मत होते.
गोलंदाजीमध्येही एक बदल झाला आहे. मोहम्मद सिराज दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी उमेश यादवला संधी मिळाली आहे. उमेशच्याऐवजी इशांत शर्माला संधी मिळेल, असे बोलले जात होते. कारण इशांतकडे मोठा अनुभव आहे. पण संघाने उमेश यादववर विश्वास दाखवला आहे. केपटाऊनमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. खेळपट्टीवर गवत आहे. पहिल्यादिवशी गोलंदाजांना मदत मिळू शकते. खेळ पुढे गेल्यानंतर खेळपट्टी थोडी मंद होईल. त्यामुळे फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळेल. दक्षिण आफ्रिकेने आपल्या विजयी संघात कोणताही बदल केलेला नाही.
(India vs south Africa For capetown test team india did two changes virat kohli & Umesh yadav are part of playin XI)