Indian Football History : जगाचं लक्ष वेधून घेणारा भारतातील पहिला यशस्वी फुटबॉलपटू माहित आहे?

| Updated on: Apr 06, 2023 | 2:47 PM

Indian Football History : भारतात आतापर्यंत फिफाच्या कुठल्या स्पर्धा झाल्यात? देशातील पहिला फुटबॉल क्लब कुठला? स्वातंत्र्यापूर्वी भारतात सर्वात मोठं यश कुठल्या फुटबॉल क्लबने मिळवलं? जाणून घ्या रंजक इतिहास

Indian Football History : जगाचं लक्ष वेधून घेणारा भारतातील पहिला यशस्वी फुटबॉलपटू माहित आहे?
Indian football
Image Credit source: AFP
Follow us on

Indian Football History : भारतात फुटबॉल एक लोकप्रिय खेळ आहे, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. भारतात लोकप्रिय खेळ म्हटलं की, लगेच डोळ्यासमोर येतं क्रिकेट. तुम्ही विचार करताय, ते एकदम बरोबरच आहे. भारतात क्रिकेट लोकप्रिय खेळ आहेच. पण त्याचरोबर फुटबॉलचा सुद्धा पहिल्या तीन लोकप्रिय खेळांमध्ये समावेश होतो. खेळाडूंचा सहभाग आणि टीव्ही प्रेक्षकसंख्या लक्षात घेतल्यास फुटबॉलचा पहिल्या तीन लोकप्रिय खेळांमध्ये समावेश होतो. क्रिकेट आणि कबड्डीच्या बरोबरीने भारतात फुटबॉलची प्रेक्षक संख्याही मोठी आहे.

इंडियन सुपर लीग ही भारतातील लोकप्रिय देशांतर्गत फुटबॉल स्पर्धा आहे. 2014 पासून सुरु झालेल्या ISL मध्ये 8 टीम खेळतात. एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनकडून ISL ला मान्यता आहे. भारतातील विविध राज्य आणि सरकारी संस्थांमध्ये संतोष ट्रॉफी ही स्पर्धा खेळली जाते.

भारतात आतापर्यंत फिफाच्या कुठल्या स्पर्धा झाल्यात?

2017 मध्ये भारतात अंडर-17 वर्ल्ड कपच आयोजन करण्यात आलं होतं. देशात झालेली फिफाची ही पहिली मोठी स्पर्धा होती. प्रेक्षक संख्येच्या दृष्टीने फिफाची ही सर्वात यशस्वी अंडर 17 वर्ल्ड कप स्पर्धा होती. 2022 मध्ये भारताने अंडर 17 महिला वर्ल्ड कपच आयोजन केलं होतं. 2019 मध्ये अंडर 20 वर्ल्ड कप आयोजित करण्याचाही प्रयत्न केला. पण पोलंडकडून पराभव झाला.

देशातील पहिला फुटबॉल क्लब कुठला?

भारतात फुटबॉलच मूळ शोधायच झाल्यास, 19 व्या शतकाच्या मध्यावर जावं लागेल. ब्रिटीश सैनिकांनी भारतीयांना या खेळाची ओळख करुन दिली. सुरुवातील लष्करी टीम्समध्ये फुटबॉल खेळला जायचा. त्यानंतर देशात क्लब फुटबॉल सुरु झालं. कॅलकता एफसी हा 1872 साली स्थापन झालेला देशातील पहिला फुटबॉल क्लब आहे. त्यावेळच्या रिपोर्ट्सनुसार सुरुवातीला रग्बी क्लब म्हणून ओळख होती. 1894 मध्ये कॅलकता एफसी फुटबॉलकडे वळला. तिथे फुटबॉलची सुरुवात झाली. 1890 च्या सुमारास सोवाबाजार, मोहन बागान आणि आर्यन क्लबची कॅलकतामध्ये स्थापना झाली.

भारतावर त्यावेळी इंग्रजांची सत्ता होती. लवकरच कॅलकता भारतातील फुटबॉलची राजधानी बनली. ग्लॅडस्टोन कप, ट्रेडर्स कप आणि कुच बिहार कप फुटबॉल स्पर्धा त्यावेळी सुरु झाल्या होत्या.

स्वातंत्र्यापूर्वी भारतात सर्वात मोठं यश कुठल्या फुटबॉल क्लबने मिळवलं

त्याकाळात सोवाबाजार क्लब यश मिळवणारी पहिली भारतीय टीम आहे. त्यांनी 1892 साली ट्रेडर्स कप जिंकला होता. मोहन बागान अॅथलटिक क्लबची 1889 मध्ये स्थापना झाली. 1911 मध्ये IFA शिल्ड जिंकून मोहन बागान क्लब लोकप्रिय झाला. याआधी भारतातील ब्रिटीश टीम्सनी हा किताब जिंकला होता. इस्ट यॉर्कशायर रेजिमेंटचा मोहन बागानने फायनलमध्ये 2-1 असा पराभव केला होता. स्वातंत्र्यापूर्वी कुठल्याही भारतीय क्लबने फुटबॉलमध्ये मिळवलेलं सर्वात मोठं यश, असच या विजयाच वर्णन करावं लागेल.

जगाच लक्ष वेधून घेणारे पहिले भारतीय फुटबॉलपटू कोण?

1893 साली कॅलकतामध्ये भारतीय फुटबॉल संघटनेची स्थापना झाली. पण 1930 पर्यंत एकही भारतीय या बोर्डवर नव्हता. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन भारतात फुटबॉलच संचालन करते. 1937 साली फेडरेशनची स्थापना झाली. महान फुटबॉलपटू ज्योतिष चंद्र गुहा हे जगाच लक्ष वेधून घेणारे पहिले भारतीय फुटबॉलपटू आहेत. इंग्लिश फुटबॉल लीगमध्ये अर्सेनलकडून 1930 साली खेळणारे ते पहिले भारतीय फुटबॉलपटू होते.