Thomas Cup 2022: समोर तिरंगा पाहून बॅडमिंटनपटूंचे डोळे पाणावले, हा VIDEO बघा, तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल

| Updated on: May 15, 2022 | 6:47 PM

क्रिस्टी विरोधात श्रीकांतने विनिंग फटका खेळताच भारताचा संपूर्ण चमू जल्ल्लोषात रमून गेला. सर्वच खेळाडूंनी कोर्टवर उतरुन जोरदार सेलिब्रेशन केलं.

Thomas Cup 2022: समोर तिरंगा पाहून बॅडमिंटनपटूंचे डोळे पाणावले, हा VIDEO बघा, तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल
Indian Badminton players
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: भारतीय बॅडमिंटनसाठी (Indian Badminton) आज ऐतिहासिक दिवस आहे. तब्बल 73 वर्षानंतर थॉमस कप (Thomas Cup) स्पर्धा जिंकून भारतीय बॅडमिंटनपटुंनी इतिहास रचला आहे. त्यामुळे आजचा दिवस भारतीय बॅडमिंटसाठी जितका आनंदाचा तितकाच भावनिक आहे. बँकॉक येथे सुरु असलेल्या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी 14 वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियला 3-0 ने हरवलं. लक्ष्य सेनपासून (Lakshya sen) सुरु झालेली ही विजयी एक्स्प्रेस किदम्बी श्रीकांतने कायम ठेवली. भारताच्या विजयात शेवटचा अध्याय किदाम्बी श्रीकांतने लिहिला. श्रीकांतने क्रिस्टी विरोधातील सामना 21-15 आणि 23-22 ने जिंकला. पहिल्या गेमवर तर श्रीकांतने पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. दुसरा गेम थोडा टाइट झाला. पण मोक्याच्याक्षणी श्रीकांतने कामगिरी उंचावली. एकवेळ असं वाटलं की, श्रीकांतला तिसरा गेम खेळावा लागेल. पण श्रीकांतने जोरदार कमबॅक केलं व चॅम्पियन म्हटल्या जाणाऱ्या खेळाडूचा किस्सा संपवला.

हा भावनिक बांध फुटला

क्रिस्टी विरोधात श्रीकांतने विनिंग फटका खेळताच भारताचा संपूर्ण चमू जल्ल्लोषात रमून गेला. सर्वच खेळाडूंनी कोर्टवर उतरुन जोरदार सेलिब्रेशन केलं. भारतीय बॅडमिंटनपूटनी अविश्वसनीय अशी कामगिरी केली. त्यामुळे सर्वांसाठीच हा भावनिक क्षण होता. पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी हा भावनिक बांध फुटला. भारतीय खेळाडू पोडियमवर असताना भारताच राष्ट्रगीत सुरु झालं. त्यावेळी खेळाडूंचे डोळे पाणावले. भारतीय बॅडमिंटनपटुंच्या या कामगिरीची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. त्यांनी टि्वट करुन भारतीय बॅडमिंटनपटुना शुभेच्छा दिल्या.

हा सांघिक विजय

किदाम्बी श्रीकांत बरोबर लक्ष्य सेन आणि सात्विक-चिरागच्या जोडीचा सुद्धा हा विजय आहे. थॉमस कप ही सांघिक स्पर्धा आहे. एचएस प्रणॉयला फायनलमध्ये उतरण्याची वेळच आली नाही. आज भारताचं स्वप्न साकार झाला. या संघाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचा, उर अभिमानाने भरुन आलेल्या प्रत्येक भारतीयाचा हा विजय आहे.

लक्ष्य सेनची जोरदार सुरुवात

इंडोनेशिया विरुद्धच्या फायनलमध्ये लक्ष्य सेनने जोरदार सुरुवात केली. सात्विक आणि चिरागने लक्ष्यने सुरु केलेला विजयाचा होम कायम ठेवला. किदाम्बी श्रीकांतने तर कळसच चढवला. विजयाला किती वेळ लागतो, हे सर्वस्वी श्रीकांच्या खेळावर अवलंबून होतं. पण भारताच्या या स्टार बॅडमिंटनपटूने आज निराश केलं नाही. 130 कोटी भारतीयांना जी प्रतिक्षा होती. ते स्वप्न साकार केलं.