दुबई : आयपीएलच्या (IPL 2020) 13 व्या मोसमात रविवारी (25 ऑक्टोबर) डबल हेडर सामने खेळण्यात आले. या डबल हेडरमधील दुसरा सामना राजस्थान रॉयल्(Rajasthan Royals) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात मुंबईने प्रथम बॅटिंग करत राजस्थानला विजयासाठी 196 धावांचे आव्हान दिले. राजस्थानने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. बेन स्टोक्स (Ben Stokes) राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने नाबाद 107 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. IPL 2020 Ben Stokes Became The First Batsman To Score A Century Twice While Chasing A Winning Score
मुंबईविरुद्धची शतकी खेळी ही स्टोक्सच्या आयपीएल कारकिर्दीतील दुसरी शतकी खेळी होती. याआधी स्टोक्सने गुजरातविरुद्ध पहिलं शतक लगावलं होतं. विशेष म्हणजे स्टोक्सने दोन्ही शतकं विजयी आव्हानाचं पाठलाग करताना लगावली आहेत. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना दुसऱ्यांदा शतकी कामगिरी करणारा स्टोक्स हा एकमेव खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे स्टोक्स दोन्ही वेळा नाबाद राहिला आहे. स्टोक्स व्यतिरिक्त एकूण 16 फलंदाजांनी विजयी आव्हानाचं पाठलाग करताना प्रत्येकी 1 शतक लगावलं आहे.
बेन स्टोक्सने मुंबईविरुद्धच्या सामन्यात 59 चेंडूत शतक पूर्ण केलं. स्टोक्सने 60 चेंडूत नाबाद 107 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 फोर आणि 3 सिक्स लगावले. स्टोक्सने याआधी 2017 मध्ये आयपीएलमधील पहिलं शतकं झळकावलं होतं. स्टोक्सने रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून खेळताना गुजरात लायन्सविरुद्ध हे शतक ठोकलं होतं. हा सामना पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर 1 मे 2017 मध्ये खेळला गेला होता.
या सामन्यात गुजरातने प्रथम बॅटिंग करताना पुण्याला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. या विजयी आव्हानाचं पाठलाग करताना स्टोक्सने 63 चेंडूत 7 फोर आणि 4 सिक्स लगावत नाबाद 103 धावा केल्या होत्या. या सामन्यात पुण्याने गुजरातवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला होता.
स्टोक्सने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 40 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 25.82 च्या सरासरीने 852 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 26 विकेट्स ही घेतल्या आहेत. वडिलांची प्रकृती स्थिर नसल्याने स्टोक्सला आयपीएलच्या या मोसमात सुरुवातीपासून खेळता आले नाही. स्टोक्स त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. दरम्यान मुंबईवर विजय मिळवल्याने प्ले ऑफच्या फेरीतील आव्हान राजस्थानने कायम राखले आहे. राजस्थान आपला आगामी सामना येत्या 26 ऑक्टोबरला पंजाबविरुद्ध खेळणार आहे.
संबंधित बातम्या :
तीन वर्ष जुनी बॅट, 20 चेंडूत अर्धशतक; हार्दिक पांड्याने सांगितली ‘राज की बात’
IPL 2020 Ben Stokes Became The First Batsman To Score A Century Twice While Chasing A Winning Score