मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या (IPL) 13 व्या मोसमातील उर्वरित सामने युएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. हा मोसम सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान पूर्ण करण्याचं बीसीसीआयचं नियोजन आहे. यासाठी बीसीसीआय स्पर्धेतील उर्वरित 31 सामन्यांचं वेळापत्रक योग्य रितीने आखण्याचं काम करत आहे.परंतु आता आयपीएलची अंतिम सामन्याची तारख डोकेदुखी ठरलीय. अगोदर 10 ऑक्टोबरला आयपीएलची फायनल खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार होता परंतु आता 10 तारखेऐवजी 18 ऑक्टोबर रोजी आयपीएल 2021 चा अंतिम सामना खेळला जाऊ शकतो. तशी घोषणा बीसीसीआय करु शकते, असं अंदाज आहे. (IPL 2021 Final Match Schudule BCCI 18 october)
ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये खूप उष्णता असते. त्यामुळे डेबल हेडर सामने खेळवणं मुश्किलीचं होऊन बसेल. सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये वातावरण खूपच गरम असते आणि दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात झाली तर खेळाडूंना तशा उष्ण वातावरणात खूप त्रास होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे.
“आम्ही आठ दिवसांचा अतिरिक्त काढू आणि डबल हेडर मॅचेसची संख्या कमी करु. यूएईमध्यल्या उष्णतेने क्रिकेटपटूंना त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणूनच दुपारी वेळेत कमी कमी मॅचेस व्हाव्या, असा आमचा प्रयत्न असेल. जर 18 ऑक्टोबरला अंतिम सामना झाला तर डबल-हेडर सामन्यांची संख्या कमी करुन आठ होईल”, असा रिपोर्ट दैनिक जागरणने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिला आहे.
आयपीएलच्या अंतिम सामना जर 18 ऑक्टोबरला झाला तर टी -20 वर्ल्ड कपच्या तारखांमध्येही बदल केले जाऊ शकतात. सध्या ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळविण्याचा विचार आहे. या स्पर्धेचे यजमानपदही भारताकडे आहे. परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता भारतातील मॅचेसवर शंकेचं सावट आहे. दुसरीकडे आयसीसीने टी ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धा आयोजनासंबंधीच्या निर्णयासाठी बीसीसीआयला एक महिन्याचा अवधी देण्याचा दिलेला आहे.
(IPL 2021 Final Match Schudule BCCI 18 october)
हे ही वाचा :
IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय
IPL 2021 : आयपीएलसाठी परदेशी खेळाडू न आल्यास कारवाई, BCCI पाऊल उचलणार