अहमदाबाद : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) स्टम्पमागून सतत काही ना काही बोलर्सला सूचना सांगत असतो किंवा अधून मधून कॉमेन्ट करत असतो. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पार पडलेल्या बंगळुरुविरुद्धच्या (Royal Challengers banglore) सामन्यातही हेच चित्र पाहायला मिळालं. बंगळुरुचा स्टार बॅट्समन ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell दिल्लाचा बोलर अमित मिश्राला (Amit Mishra) उत्तुंग षटकार खेचला. यावेळी रिषभही आश्चर्यचकित झाला. ‘ये ते बहुत तेज घुमाया…’, अशी कमेंट त्याने यावेळी केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (IPL 2021 RCB vs DC Rishabh Pant commentary behind the stumps and Comment on Glenn Maxwell Six)
बंगळुरुच्या डावाच्या आठव्या ओव्हरमध्ये दिल्लीकडून अमित मिश्रा बोलिंगसाठी आला. याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर ग्लेन मॅक्सवेलने एक उत्तुंग षटकार ठोकला. हा सिक्स 85 मीटरचा होता. मॅक्सवेलने ज्या नजाकतीने हा सिक्स मारला ते पाहून रिषभ पंतही हैरान झाला. स्टम्पमागून रिषभ म्हणाला, ‘बहुत तेज घुमाया ये तो….’ रिषभच्या याच हिंदी कॉमेन्ट्रीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
— Cricket Unlimi (@CricketUnlimi) April 27, 2021
बंगळुरु विरुद्ध दिल्ली या तुल्यबळ सामन्यात बंगळुरुने दिल्लीवर अवघ्या एका रन्सने निसटता विजय मिळवला आहे. बँगलोरने दिल्लीला 172 धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु दिल्लीला निर्धारित 20 षटकांमध्ये 4 बाद 170 धावांपर्यंत मजल मारता आली. शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला 14 रन्सची गरज होती. मात्र मोहम्मद सिराजने टिच्चून बोलिंग केली. त्याने यॉर्कर खूप नजाकतीने टाकले. तरीही पंतने त्याला दोन चौकार ठोकले. अखेर दिल्लीला शेवटच्या ओव्हरमध्ये 12 रन्सच करता आल्या. शेवटी बंगळुरुचा 1 रन्सने विजय झाला. यावेळी रिषभ पंत खूपच निराश झाला होता तर विराटला गगनात आनंद मावत नव्हता.
दिल्लीकडून शिमरन हेटमायरने धडाकेबाज खेळी करत अवघ्या 25 चेंडूत 53 धावांची खेळी करत या सामन्यातील दिल्लीचं आव्हान शेवटच्या चेंडूपर्यंत जिवंत ठेवलं होतं. पण सामना न जिंकल्याने त्याची धडाकेबाज 53 रन्सची खेळी व्यर्थ गेली.
(IPL 2021 RCB vs DC Rishabh Pant commentary behind the stumps and Comment on Glenn Maxwell Six)
हे ही वाचा :
DC vs RCB IPL 2021 Match 22 Result : थरारक सामन्यात विराटसेनेचा दिल्लीवर अवघ्या 1 धावेने विजय