मुंबई : आयपीएलमध्ये (IPL 2022) सध्या खेळाडूंच्या खेळीपेक्षाही चर्चा सुरु रंगतेय, ती आयपीएल संघाच्या मालकांची. त्यांच्या रिएक्शनची आणि त्यांची सेलिब्रेशनची. इंडियन प्रीमियर लीगमध्ये डेविड वॉर्नरची (David Warner) बॅट तळपतेय. फॉर्मात असलेल्या डेविडनं हैदराबाद सोडून दिल्लीच्या संघात प्रवेश केला. दिल्लीच्या संघात (DC) आल्यापासून डेविडची बॅट कमालीच्या लयीत दिसली आहे. हैदराबादच्या सामन्यात तर थेट डेविडनं तडाखेबंद फलंदाजी केली. अवघ्या 58 चेंडूत 92 धावांची खेळी डेविडनं केली. नॉट आऊट राहिलेल्या डेविडच्या खेळीनं दिल्लीनं हैदराबादवर 21 धावांनी दणदणीत विजय मिळवला. असं असूनी सध्या डेविडपेक्षाही चर्चा रंगली आहे ती हैदराबादच्या काव्या मारनची. काव्या मारन कमालीची ट्रोल होतेय. अनेकांनी तिला सुनावलंय. सोशल मीजियावर हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामना झाल्यानं काव्यावर निशाणा साधलाय. डेविडच्या खेळीनं काव्याला रात्रभर वाईट स्वप्न पडत राहतील, असं म्हणत तिची खिल्ली उडवण्यात आली आहे.
WARner tonight against
Tom Moody and Kavya Maran..??? pic.twitter.com/QMFgVgYwe9— Suyog Kamble (@Suyogg15) May 5, 2022
काव्या मारन हैदराबार सनरायजर्स संघाच्या मॅनेजमेन्ट टीमचा प्रमुख भाग आहे. या संघानं डेविड वॉर्नरला यंदाच्या ऑक्शनमध्ये सोडलं होतं. 2016 साली डेविड वॉर्नरला कॅप्टन्सीसाठीही हैदराबादकडून खेळताना गौरवण्यात आलेलं. गेल्या वर्षापर्यंत हैदराबादकडून खेणाऱ्या डेविडनं दिल्लीत एन्ट्री केली. दिल्लीच्या संघात येताच डेविडनं हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत सगळ्यांना चकीत केलंय.
SRH fans to Kavya Maran for not retaining Warner #SRHvsDC pic.twitter.com/vPaDN4YjTq
— BE21EVER (@lawncricket) May 5, 2022
खरंतर गेल्या काही आयपीएलमध्ये डेविड वॉर्नर हैदराबादकडून खेळताना तितकासा फॉर्मात नव्हता. त्यामुळे हैदराबाद संघाचं मॅनेजमेन्ट त्यावर नाराज नसेल कशावरुन? अशी कुजबूजही सुरु झाली होती.
In 10 innings this season, Kane Williamson has under 100 strike rate in 6 innings.
— Johns. (@CricCrazyJohns) May 5, 2022
मात्र 2022च्या ऑक्शनमध्ये दिल्लीनं डेविडला आपल्या ताफ्यात घेत आपला संघ अधिक मजबूत केला. 6.25 कोटी रुपये दिल्लीनं डेविड वॉर्नरसाठी मोजले होते.
Kavya Maran after seeing David Warner’s performance pic.twitter.com/AXsuObuRYz
— Vishal Deshmukh (@kaafiAverage) May 5, 2022
आपल्यावरचा विश्वास डेविडनं सार्थकी ठरवलाय. त्याचीच प्रतिची हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आली. पण यानंतर आता काव्या मारनला सोशल मीडियात ट्रोल केलं जातंय.