मुंबई – आयपीएल 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं धीम्या गतीने फलंदाजी 170 धावांचा टप्पा ओलांडला. मधल्या फळीचे फलंदाज झटपट बाद झाल्याने मुंबईचं पारडं जड झालं होतं. पण बापू म्हणून प्रसिद्ध असलेला अक्षर पटेलनं सर्वच गणितच बिघडवलं. सहाव्या गड्यासाठी वॉर्नर आणि अक्षर पटेलनं अर्धशतकी भागीदारी केली. अक्षर पटेलनं आक्रमक खेळी करत 25 चेंडूत 54 धावा केल्या. दुसरीकडे अक्षर पटेलला आऊट करण्याची संधी बेहरेनडॉर्फला चालून आली होती. पण ती संधी सूर्यकुमार यादवनं सोडली. त्यानंतर अक्षर पटेलनं संधीचं सोनं केलं.
बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला पण हा चेंडू सूर्यकुमार यादवच्या हातात होतात. पण झेल पकडण्याऐवजी हातातून तोंडावर आदळला आणि थेट षटकार गेला. त्यानंतर रोहित शर्मावर कॅमेरा गेला असता वैतागलेला दिसला. अक्षर पटेलनं अखेर 25 चेंडूत 54 धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीला 172 ही धावसंख्या उभारता आली.
India Mr 360 . #TATAIPL2023 #MIvsDC Suryakumar Yadav #IPLonJioCinema pic.twitter.com/Zc3A2bFnPd
— Subhash Nairy (@subhashnairy) April 11, 2023
Suryakumar Yadav seems to have hurt himself while attempting that catch of Axar Patel! #DCvMI #IPL2023 pic.twitter.com/0m06aQKbFy
— Mohsin Kamal (@64MohsinKamal) April 11, 2023
दिल्लीकडून डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ ही जोडी मैदानात आली. दोन्ही खेळाडूंनी सावध खेळीने सुरुवात केली. ही जोडी फोडण्यात ऋतिक शोकीनला यश आलं. पियुष चावला याच्या गोलंदाजीवर मनिष पांडे बाद झाला. त्याने 18 चेंडूत 26 धावा केल्या. त्यानंतर यश धुल आला आणि हजेरी लावून गेला. रिले मेरेडिथच्या गोलंदाचीवर नेहन वधेराने त्याचा झेल घेतला. रोवमॅन पॉवेल काही खास करू शकला नाही. 4 धावांवर पियुष चावलानं त्याला पायचीत केलं. त्यानंतर आलेला ललित यादवही काही खास करू शकला नाही. 2 या धावसंख्येवर त्रिफळाचीत झाला.
डेविड वॉर्नर आणि अक्षर पटेल जोडीने चांगली फटकेबाजी केली. एका बाजूला 43 चेंडूत डेविड वॉर्नरने आपलं अर्धशतक झळकावलं. त्यानंतर अक्षर पटेलनं जलद अर्धशतक झळकावलं. त्याने 25 चेंडूत 54 धावा केल्या. अक्षर बाद झाल्यानंतर डेविड वॉर्नर 47 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादवला यादवला भोपळाही फोडता आला नाही. धावचीत होत तंबूत परतला.
त्यानंतर अभिषेक पेरोल 1 धाव करून झेल बाद झाला. एनरिच नॉर्तजे 5 धावांवर त्रिफळाचीत झाला. एकाच षटकात 4 गडी बाद झाले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारत्या आल्या नाहीत.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, अर्शद खान, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, रिले मेरेडिथ
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मनीष पांडे, यश धुल, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिजुर रहमान