IPL 2025 : कपाळावर आठ्या, चेहरा त्रस्त, संजीव गोएंका पुन्हा भडकले, ऋषभ पंतवर उगारलं बोट, तो फोटो व्हायरल

| Updated on: Apr 02, 2025 | 10:39 AM

एक फोटो हा हजारो शब्दांपेक्षा बोलका असतो असं म्हणतात. पंजाब किंग्सकडून पराभव पत्करावा लागल्यानतंर लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका पुन्हा चर्चेत आले आहेत. संजीव गोएंका आणि ऋषभ पंतचा फोटोही असाच बोलका असून त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. नेमकं काय झालं ?

IPL 2025 : कपाळावर आठ्या, चेहरा त्रस्त, संजीव गोएंका पुन्हा भडकले, ऋषभ पंतवर उगारलं बोट, तो फोटो व्हायरल
संजीव गोएंकांचा ऋषभ पंतशी उडाला खटका ?
Image Credit source: PTI
Follow us on

एक फोटो हा हजारो शब्दांपेक्षा बोलका असतो असं म्हणतात. पंजाब किंग्सकडून पराभव पत्करावा लागल्यानतंर लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका पुन्हा चर्चेत आले आहेत. संजीव गोएंका आणि ऋषभ पंत या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पुरेसा बोलका आहे. 1 एप्रिलला पंजाबकडून लखनऊचा पराभव झाला. त्यानतंर साहजिकच लखनऊचे मालक संजीव गोएंका अपसेट झाले. मैदानात असताना ते ऋषभ पंतशी बोलत होते, तेव्हाची त्यांची देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव त्रस्त होते. ऋषभशी बोलताना त्यांनी त्याच्या दिशेने बोट उठवल्याचा एका फोटो सध्या वेगाने व्हायरल झाला असून त्यानंतर नेटकऱ्यांनी विविध कयास लावण्यास सुरूवात केली आहे.

हा फोटो पाहून अनेकांना मागच्या आयपीएल सीझनची आणि पर्यायाने के.एल. राहुलची आठवण आली. आयपीएल 2024 मधील पराभवानंतर गोयंका यांनी आपल्या कर्णधाराला, के.एल.राहुलला जाहीरपणे फटकारल्यामुळे बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. आणि आता या सीझनमध्येही त्यांची अशीच शैली आणि स्वभाव दिसून येत आहे. समोर आलेल्या फोटोंमुळे पुन्हा त्याच चर्चांना उधाण आलं आहे.

पंजाबने लखनऊचा केला 8 विकेट्सनी पराभव

लखनौ सुपर जायंट्सच्या घरच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने 8 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करतना एलएसजीने 20 षटकांत 7 गडी गमावून 171 धावा केल्या. त्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जने हे आव्हान 17 व्या षटकातंच पूर्ण केले, 172 धावा करताना त्यांनी अवघे 2 गडी गमावले. अशाप्रकारे एकीकडे पंजाब किंग्जने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकण्यात यश मिळवले. पण लखनौला आतापर्यंत झालेल्या 3 सामन्यांमधला दुसरा पराभव पत्करावा लागला.

संजीव गोएंका-ऋषभ पंतचा फोटो व्हायरल

एलएसजीचे मालक संजीव गोएंका हे संघाच्या त्याच खराब कामगिरीमुळे फारच वैतागले आहेत हे ऋषभ पंतसोबतच्या त्या फोटोवरून लक्षात येतंय, तो फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरलही झाला. त्यामध्ये त्यांन ऋषभला उद्देशून बोट उचललं आहे. ऋषभ पंतची फ्लॉप फलंदाजी हे देखील संजीव गोयंका यांच्या या कृतीचे एक प्रमुख कारण असू शकते.

 

एलएसजीने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी 27 कोटी रुपयांची बोली लावून पंतला विकत घेतले. पण, आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. त्या 3 सामन्यांमध्ये त्याने जेवढे चेंडू खेळले तेवढ्या धावाही केल्या नाहीत. ऋषभ पंतने 3 सामन्यात केलेल्या केवळ 17 धावा त्याला मिळत असलेल्या 27 कोटी रुपयांच्या तुलनेत फारच कमी असल्याची चर्चा सुरू आहे.

नेटकऱ्यांना आठवला के.एल.राहुल !

मात्र, ऋषभ पंत आणि संजीव गोयंका यांच्या व्हायरल होत असलेल्या या फोटोने चाहत्यांना केएल राहुलची आठवण आली. कारण, आयपीएलच्या मागच्या सीझनमध्ये राहुलही त्याच जागी उभा होता. सध्या IPL 2025 मध्ये ऋषभ पंत त्याच जागी आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट्स केल्या आहेत.

IPL 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा पुढील सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहे, तो जिंकण्यासाठी त्यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील. तसेच ऋषभ पंतवरही चांगली कामगिरी करण्याचे दडपण असेल.