मुंबई – गतवर्षीचा उपविजेता कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएल 2022 मध्ये 9 पैकी 6 सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. संघ प्ले ऑफमधून बाद होण्याचा धोका अधिक आहे. गुरुवारी झालेल्या स्पर्धेतील ४१ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) कोलकाता नाईट रायडर्सचा ४ गडी राखून पराभव केला. कोलकात्याच्या या पराभवाचा दोषी दुसरा कोणी नसून स्टार अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russell) जबाबदार आहे.
कोलकाताच्या डावाच्या 14 व्या षटकात आंद्रे रसेल फलंदाजीला आला. त्यावेळी कोलकाताचा अर्धा संघ केवळ 83 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अशा स्थितीत संघाला रसेलकडून मोठ्या आणि जबाबदार खेळीची अपेक्षा होती. मात्र त्याने खाते न उघडता 3 चेंडूतच आपली विकेट गमावली. रसेलला कुलदीप यादवने बाद केले. कुलदीपने स्टंपवर गुगली लावली होती. ज्यावेळी रसेल पुढे जाऊन शॉट खेळायचा होता. त्यावेळी चेंडू वळला आणि तो आऊट झाला. विशेष म्हणजे ऋषभला सुध्दा तो चेंडू पकडता आला नाही, पण चेंडू त्याच्या ग्लोव्हजला लागून स्टंपला लागला आणि रसेल शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.
झालेल्या सामन्यात आंद्रे रसेलला फक्त एकच षटक टाकण्याची संधी मिळाली. त्यातही त्याने १४ धावा दिल्या. दिल्लीच्या डावातील 15 व्या षटकात रसेल गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी डीसीची धावसंख्या 14 षटकांत 99/5 होती. रसेलच्या षटकातील पहिल्या चेंडूवर अक्षर पटेलने मिड-विकेटवर चौकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. या षटकासह दिल्लीने पुन्हा एकदा सामन्यात दमदार पुनरागमन केले. 41 व्या सामन्यात दिल्लीसमोर 147 धावांचे लक्ष्य होते. दिल्ली संघाने 18 व्या षटकात 6 गडी गमावून पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नर (42) याने सर्वाधिक धावा केल्या, तर रोव्हमन पॉवेल याने 16 चेंडूत नाबाद 33 धावा करून दिल्ली विजय निश्चित केला. कोलकाताच्या खात्यात उमेश यादवने 3 बळी घेतले.
नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स 20 षटकांत 9 गडी गमावून 146 धावा केल्या. नितीश राणाने सर्वाधिक 57 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी कर्णधार श्रेयस अय्यरने 42 धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीप यादवने 4 आणि मुस्तफिजुर रहमानने 3 बळी घेतले.