IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंतवर पैशांचा पाऊस पडला. याआधी कुठल्या खेळाडूवर इतकी विक्रमी बोली लागलेली नाही. LSG ने ऋषभ पंतवर पाण्यासारखा पैसा खर्च केला. त्यांनी 27 कोटी रुपये खर्च करुन ऋषभ पंतला विकत घेतलं. आयपीएलच्या इतिहासातील इतक्या महागड्या किंमतीला बोली लागल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयनका यांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप होताना दिसतोय. पंतला जास्त किंमतीला विकत घेतल्याचा त्यांना पश्चाताप आहे.
IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये संजीव गोयनका यांना ऋषभच्या खरेदीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यांच्या मनातील भावना समोर आल्या. संजीव गोयनका यांनी त्यांच्या मनात जे होतं, ते बोलून दाखवलं. ऋषभ पंतला 27 कोटी थोडे जास्तच मिळाले, हे मान्य केलं.
आम्ही आधीच विचार केलेला
संजीव गोयनका यांच्यानुसार ऋषभ पंत LSG च्या प्लानचा भाग होता. त्याला विकत घेण्याचा आम्ही आधीच विचार केलेला. त्यासाठी रक्कम सुद्धा ठरवली होती. पण 27 कोटी थोडे जास्त खर्च झाले. ऋषभ पंतच LSG कडून खेळणं ही टीमच्या फॅन्ससाठी आनंदाची बाब असल्याच त्यांनी मान्य केलं. “पंत एक चांगला खेळाडू आहे, मॅच विनर आहे. त्याचा आम्हाला फायदा मिळेल” असं संजीव गोयनका म्हणाले.
“Pant was always part of the plan” – #SanjivGoenka addresses the mega purchases of #RishabhPant and #DavidMiller at the #TATAIPLAuction! 💬
📺 #IPLAuctionOnJioStar DAY 2 👉 MON 25 NOV, 2:30 PM on Star Sports Network & JioCinema!#TATAIPL #LucknowSuperGiants pic.twitter.com/QfazNDCW2z
— Star Sports (@StarSportsIndia) November 24, 2024
ऋषभ पंतची बेस प्राइस किती होती?
IPL 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंतने आपली बेस प्राइस 2 कोटी रुपये ठेवली होती. ऑक्शनमध्ये त्याला जास्त पैसा मिळेल असा अंदाज होता. तो सर्व रेकॉर्ड तोडणार अशी अपेक्षा होती आणि घडलं सुद्धा तसच. पंजाब किंग्स, केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण यात बाजी LSG ने मारली.