IPL 2025 : एका मॅचमध्ये किती पैसा कमावतात चीअरलीडर्स? आकडा ऐकून डोळे विस्फारतील

| Updated on: Dec 03, 2024 | 2:05 PM

आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शननंतर चीअरलीडर्सच्या पगारांची चर्चा रंगली आहे. चीअरलीडर्सना प्रत्येक मॅचसाठी 15 ते 25 हजार रुपये मिळतात, कोलकाता नाईट रायडर्स सर्वाधिक पगार देते. चीअरलीडिंगचा इतिहास अमेरिकेतील फुटबॉलपासून सुरू झाला, आज आयपीएलमध्ये त्यांचे योगदान अमूल्य आहे आणि त्यांची लोकप्रियता वाढत आहे.

IPL 2025 : एका मॅचमध्ये किती पैसा कमावतात चीअरलीडर्स? आकडा ऐकून डोळे विस्फारतील
IPL Cheerleader
Follow us on

आयपीएल 2025ची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात मेगा ऑक्शन झालं. त्यात 180 हून अधिक खेळाडूंवर कोट्यवधीची बोली लागली. तर काही खेळाडू विकलेच गेले नाही. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. या लीगची चमक काही औरच असते. लोक लीगमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडतात. आयपीएलमध्ये केवळ खेळाडूच कमवत नाहीत. तर चीअरलीडर्सही प्रचंड पैसा कमावतात. कमाईच्या बाबतीत चीअरलीडर्सही काही कमी नाहीत. आयपीएलमध्ये चीअरलीडर्सना किती पैसा मिळतो याचीच आज आपण चर्चा करणार आहोत.

मीडिया रिपोर्टनुसार, चीअरलीडर्सना प्रत्येक मॅचसाठी 15 ते 25 हजार रुपये मिळतात. आयपीएलमध्ये चीअरलीडर्सला सर्वाधिक सॅलरी कोलकाता नाईट रायडर्सकडून दिली जाते. ही टीम चीअरलीडर्सला प्रत्येक मॅचसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये देते. मुंबई आणि आरसीबी सुमारे 20 हजार रुपये देतात. एवढंच नव्हे तर जो संघ जिंकतो, त्या संघाच्या चीअरलीडर्सला बोनसही दिला जातो.

चीअरलीडर्सची क्रेझ

आयपीएलमध्ये चीअरलीडर्सचं वेगळंच महत्त्व आहे. 2008मध्ये आयपीएलची सुरुवात झाली. त्यात विदेशी चीअरलीडर्स सामील झाल्या. खेळाडू आणि फॅन्सचा उत्साह वाढवण्यासाठी चीअरलीडर्सचा समावेश करण्यात आला होता. पण काळानुसार चीअरलीडर्स या परंपरेचा भाग नाही तर आयपीएलचा मुख्य भाग बनल्या.

मॅच दरम्यानच्या चीअरलीडर्सच्या डान्स मुव्हज आणि परफॉर्मन्स प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. त्यांचं मनोरंजन होतं. खासकरून विदेशी चीअरलीडर्सकडे प्रेक्षक अधिक आकर्षित होतात. टुर्नामेंटमध्ये प्रत्येक टीम आपल्या चीअरलीडर्सला महत्त्व देतात. आयपीएलची भव्यता आणि ग्लॅमरमध्ये चीअरलीडर्सचं योगदान नाकारता येत नाही. त्या केवळ मॅचचा उत्साह शिगेला नेऊन ठेवत नाहीत, तर क्रिकेटशी संबंधित उत्साहही वाढवतात. त्यामुळे चीअरलीडर्स हा प्रोफेशनल आता अधिक वेगाने पसरू लागला आहे.

कशी झाली सुरुवात?

चीअरलीडिंगचा इतिहास अनोखा आहे. हा व्यवसायाची सुरुवात सर्वात आधी अमेरिकेत झाली. सुरुवातीला अमेरिकेत फुटबॉल मॅचवेळी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी चीअरलीडर्सचा वापर केला गेला. चीअरलीडर्स म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर महिला दिसतात. त्यावेळी पुरुष चीअरलीडर्सचं काम करायचे. 1898मध्ये पहिल्यांदा फुटबॉल मॅचवेळी चीअरलीडर्स दिसल्या होत्या. त्यावेळी पुरुष चीअरलीडर्स टीमला चिअर करायचे. ही परंपरा 1923 पर्यंत कायम होती.