तुम्हीच सांगा OUT की NOT OUT बिग बॅश लीगमध्ये तिसऱ्या पंचांचा निर्णय चुकला का?

| Updated on: Feb 03, 2023 | 6:17 PM

हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा OUT की NOT OUT? डीआरएस घेऊन नाबाद दिल्यामुळे खेळाडूंनी पुन्हा आक्षेप घेतला. थर्ड अम्पायरने निर्णय देताना एलबीडब्ल्यू आहे की नाही हे तपासलं मात्र कीपरने झेल घेतला आहे की नाही हे पाहिलं नाही.

तुम्हीच सांगा OUT की  NOT OUT बिग बॅश लीगमध्ये तिसऱ्या पंचांचा निर्णय चुकला का?
Follow us on

कॅनबेरा : क्रिकेट जगतामध्ये काहीना काही घटना घडत असलेल्या आपण पाहत असतो. पंचांचे काही निर्णयही वादग्रस्त ठरतात आणि त्यावरून वाद झालेला दिसतो. अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला असून याची क्रिकेट वर्तुळातही जोरदार चर्चा आहे.  बिग बॅश लीगमधील गुरूवारी सिडनी सिक्सर्स विरुद्ध ब्रिस्बेन हीट यांच्यामधील सामन्यात थर्ड अम्पायरने नाबाद दिलं होतं. मात्र खेळाडूंनी आक्षेप घेतल्यावर पंचांनी पुन्हा खेळाडूला बाद देण्याचा निर्णय घेतला. या दरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा OUT की NOT OUT?

सिडनी सिक्सर्स विरुद्ध ब्रिस्बेन हीट यांच्यातील सामन्यावेळी पॉवरप्लेमध्ये पहिल्याच चेंडूवर फ्लिप मॅथ्यूने कुहनमनला स्वीप मारायला गेला पण त्यामध्ये तो फसला. कारण चेंडू मारताना फ्लिप मॅथ्यू मिस झाला चेंडू कीपरच्या हातात गेला, त्यावेळी अंपायरने अपील फेटाळत लावल्यामुळे ब्रिस्बेन संघाने डीआरएस घेतला होता. तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद ठरवलं कारण  त्यामध्ये बॅटरच्या ग्लोव्ह्जला बॉल लागला होता. त्यामुळे थर्ड अम्पायरने नाबाद दिलं होतं.

 

डीआरएस घेऊन नाबाद दिल्यामुळे खेळाडूंनी पुन्हा आक्षेप घेतला. थर्ड अम्पायरने निर्णय देताना एलबीडब्ल्यू आहे की नाही हे तपासलं मात्र कीपरने झेल घेतला आहे की नाही हे पाहिलं नाही. त्यामुळे खेळाडूंनी पुन्हा अपील केलं. तिसऱ्या पंचांनी निरखून पाहिल्यावर दिसून आलं की, बॅटरच्या ग्लोव्ह्जला चेंडू लागल्यावर तो कीपरच्या हातात जावून विसावला होता. त्यामुळे पंचांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि फ्लिपला बाद देण्यत आला.

मैदानावरील पंचाचं ठीक आहे पटकन लक्षात येक नाही मात्र तिसऱ्या पंचांकडून झालेल्या चुकीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.  सामन्यामध्ये ब्रिस्ब्नेन हीटने हा सामना 4 विकेट्सने जिंकला. सिडनी सिक्सर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांंमध्ये 116 धावा फलकावर लावल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रिस्बेन हीटने 10 बॉल शिल्लक ठेवत  हे लक्ष्य पूर्ण केलं. ब्रिस्बेन हीटकडून मायकल नेसरने नाबाद 48 धावा करत संघाला विजयापर्यंत पोहोचवलं.

दरम्यान, याआधीही अनेक सामन्यांमध्ये असे काही वादग्रस्त निर्णय देण्यात आले होते. ज्याची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा झाली. मागे खेळाडूने सीमारेषेवर पकडलेला झेल वादग्रस्त ठरला होता.