चंदीगड: पंजाब मध्ये आणखी एका कबड्डीपटूची हत्या (Kabbadi player shot dead) झाली आहे. मंगळवारी रात्री पतियाळामध्ये पंजाब विद्यापीठाच्या (Punjab univercity) गेट समोर चकमक झाली. यावेळी धरमिंदर सिंग (Dharminder Singh) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मागच्या महिन्यात 14 मार्च रोजी जालंधरमध्ये संदीप सिंह नानगल या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. चार हल्लेखोरांनी हे कृत्य केलं होतं. पोलिसांनी या प्रकरणात चौघांना अटक केली. या प्रकरणात कॅनडामधील एका एनआरआयच नाव आलं आहे. धरमिंदर दौन कालान गावातील कबड्डी क्लबचा अध्यक्ष होता. राजकारणातही तो सक्रीय होता. पंजाबमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी धरमिंदरने शिरोमणी अकाली दलाची साथ आम आदमी पार्टीसाठी प्रचार केला.
मंगळवारी संध्याकाळी दौन कालान आणि थेरी गावातील गावकरी विद्यापीठामध्ये भिडले. विद्यापीठाबाहेर एक धाबा आहे, तिथे दोन्ही गट बैठकीसाठी आले होते. धरमिंदर आपल्या गावातील गावकऱ्यांच प्रतिनिधीत्व करत होता. चर्चा सुरु होती. तितक्यात कोणीतरी गोळी झाडून धरमिंदरची हत्या केली.
“आम्ही मृतदेह ताब्यात घेतला असून चौकशी सुरु केली आहे. चारजण या हत्याकांडामागे आहेत. त्यांची ओळख पटली आहे” असं पतियाळाचे एसएसपी नानक सिंह यांनी सांगितलं. “आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणात गँगस्टर्सचा सहभाग नाहीय” अशी माहिती नानक सिंह यांनी दिली. दुश्मनीतून झालेली ही हत्या आहे. प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मंगळवारी पंजाबचे पोलीस प्रमुख व्ही.के. भावरा यांना गँगस्टर्स विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास सांगितलं आहे. संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्याची भगवंत मान यांची भूमिका आहे.