विराटच्या समर्थनार्थ कैफ मैदानात

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : परदेशी संघाला समर्थन देणाऱ्या चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला देणाऱ्या विराट कोहलीवर सध्या सोशल मीडियातून तुफान टीका होत आहे. मात्र, भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने विराटला पाठिंबा दिला आहे. केवळ पाठिंबाच नव्हे, तर विराटने दिलेला सल्ला योग्य असल्याचे कैफचे म्हणणे आहे. “कोहलीला मुद्दाम ट्रोल केलं जात आहे. ट्रोलर्स प्रसिद्धीसाठी खेळाडूंना ट्रोल करतात. […]

विराटच्या समर्थनार्थ कैफ मैदानात
Follow us on

मुंबई : परदेशी संघाला समर्थन देणाऱ्या चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला देणाऱ्या विराट कोहलीवर सध्या सोशल मीडियातून तुफान टीका होत आहे. मात्र, भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफने विराटला पाठिंबा दिला आहे. केवळ पाठिंबाच नव्हे, तर विराटने दिलेला सल्ला योग्य असल्याचे कैफचे म्हणणे आहे.

“कोहलीला मुद्दाम ट्रोल केलं जात आहे. ट्रोलर्स प्रसिद्धीसाठी खेळाडूंना ट्रोल करतात. विराट जगभरात ओळखला जाणारा खेळाडू आहे. विराटच्या विधानात तथ्य होतं. त्यामुळे विराटवर टीका करणारे स्वत:ला प्रकाशझोतात आणू इच्छितात.” असे विराटच्या समर्थनार्थ मोहम्मद कैफने ट्वीट केलं आहे.


काय आहे प्रकरण :

विराट कोहलीने बुधवार (7 नोव्हेंबर) एका चाहत्याने मेसेज पाठवला होता की, भारतीय खेळाडूंपेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे फलंदाज उत्तम खेळतात.” तसेच, क्रिकेट चाहत्याने कोहलीच्या फलंदाजीवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते.

या चाहत्याला उत्तर देताना विराट भडकला. त्याने त्याच्या ट्वीटला रिप्लाय देताना म्हटले, “मला नाही वाटतं की, तू भारतात राहायला नको. त्यापेक्षा तू परदेशात जाऊन राहा. भारतात राहत असशील तर तुला भारतीय खेळाडूच आवडायला हवेत.” दरम्यान, कोहलीच्या या वक्तव्यावर बीसीसीआय नाराज असून, याबद्दल त्याला फटकारलं आहे.