टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग सध्या चर्चेमध्ये आहेत. योगराज सिंग यांनी अलीकडेच 1983 च्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचे कॅप्टन कपिल देव यांच्याबद्दल मोठ वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, “एकदा मी रागाच्या भरात कपिल देव यांना मारण्यासाठी बंदुक घेऊन त्यांच्या घरी गेलो होतो” योगराज सिंग यांचं हे स्टेटमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं. आता कपिल देव यांची योगराज सिंग यांच्या या वक्तव्यावर Reaction आली आहे.
पत्रकारांनी कपिल देव यांना गाठून योगराज सिंग यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया विचारली, त्यावर त्यांचं उत्तर अनेकांसाठी हैराण करणारं होतं. कपिल देव यांनी योगराज सिंग यांना ओळखण्यासच नकार दिला. कपिल देव म्हणाले की, कोण आहे? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? त्यावर पत्रकार त्यांना म्हणाले की, योगराज सिंग, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडिल. त्यावर कपिल म्हणाले की, ‘अच्छा, अजून काही?’ इतकं बोलून पुढे निघून गेले.
‘मी त्याला शिव्या दिल्या’
योगराज सिंग यांनी अनफिल्टर्ड बाय समदीशला एक मुलाखत दिली. “कपिल देव जेव्हा भारत, नॉर्थ झोन आणि हरियाणाचे कॅप्टन झाले, त्यावेळी त्यांनी कुठलही कारण नसताना मला टीमच्या बाहेर काढलं” असं योगराज सिंग या मुलाखतीत म्हणाले. “माझ्या पत्नीच म्हणणं होतं की, मी यासाठी कपिल देव यांना जाब विचारला पाहिजे. मी तिला म्हणालो की, मी या माणसाला धडा शिकवणार. मी माझी पिस्तुल काढली व सेक्टर 9 मधील कपिल देवच्या घरी गेलो. तो आपल्या आईसोबत बाहेर आला. मी त्याला शिव्या दिल्या. मी त्याला म्हणालो, तुझ्यामुळे मी माझा मित्र गमावला आहे. तू जे केलस, त्याची किंमत तुला चुकवावी लागेल”
Kapil Dev said “Yograj singh kon hai”?😭 pic.twitter.com/h6qkSho9UW
— Dhonism (@Dhonismforlife) January 13, 2025
योगराज सिंग आंतरराष्ट्रीय स्तरावर किती क्रिकेट खेळलेत?
योगराज सिंग म्हणाले की, “मला तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे. पण मी असं करणार नाही. कारण तू तुझ्या पवित्र आईसोबत इथे उभा आहेस. हा तोच क्षण होता, जेव्हा मी ठरवलं की, मी पुन्हा क्रिकेट खेळणार नाही. युवी खेळणार” युवराज सिंगप्रमाणे त्याचे वडील योगराज सिंग सुद्धा टीम इंडियाकडून खेळले आहेत. डिसेंबर 1980 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे फॉर्मेटमध्ये ब्रिस्बेनमध्ये त्यांनी डेब्यु केला होता. आपल्या करिअरमध्ये ते एक टेस्ट आणि फक्त सहा वनडे सामने खेळू शकले.