IND vs AUS : ‘विराटला मी माझा खांदा….’, पर्थ टेस्ट आधी किंग कोहलीला ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून धमकी

| Updated on: Nov 16, 2024 | 2:36 PM

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाकडून माइंड गेम सुरु झालाय. विराट कोहलीवर दबाव टाकण्यासाठी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी एक वेगळीच भाषा सुरु केली आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीज दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे.

IND vs AUS : विराटला मी माझा खांदा...., पर्थ टेस्ट आधी किंग कोहलीला या ऑस्ट्रेलियन खेळाडूकडून धमकी
Virat Kohli
Image Credit source: PTI
Follow us on

टीम इंडिया ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरीज जिंकण्याच्या इराद्याने दाखल झाली आहे. खेळाडूंनी पर्थच्या मैदानात कसून सराव सुरु केला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही सीरीज महत्त्वाची आहे. विराट कोहलीचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. मागच्या 10 इनिंगमध्ये विराटने फक्त 20 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र, तरीही पहिल्या कसोटीआधी प्रतिस्पर्धी टीममध्ये विराट कोहलीचीच सर्वात जास्त चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन टीम विराटला हलक्यात घेत नाहीय. त्यामागे ऑस्ट्रेलियात त्याची शानदार कामगिरी हे एक कारण आहे. ऑस्ट्रेलियन टीमने विराटच्या बॅटला शांत ठेवण्यासाठी एक खास प्लान बनवला आहे. मिचेल मार्शने विराट कोहलीच्या बॅटला शांत ठेवण्याची धमकीच दिली आहे.

विराट कोहली मागच्या काही काळापासून फॉर्ममध्ये नाहीय. पण ऑस्ट्रेलिया त्याची आवडीची जागा आणि टीम आहे. तिथे त्याने 13 सामन्यात 54.08 च्या सरासरीने 1353 धावा केल्या आहेत. यात 6 सेंच्युरी आणि चार हाफ सेंच्युरी आहेत. हाच रेकॉर्ड लक्षात घेऊन मिचेल मार्शने कोहलीला लवकर आऊट करण्याचा प्लान केलाय.

तर तो खतरनाक

मार्शने म्हटलय की, “पर्थ कसोटीत कोहली 30 रन्सपर्यंत आऊट झाला नाही, तर मी त्याला खांदा मारुन चिथावण्याचा प्रयत्न करीन. जेणेकरुन तो लवकर आऊट व्हावा” त्याचवेळी सोबतचा खेळाडू मार्नस लाबुशेनने एक वेगळा प्लान सांगितला. “विराटला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखायच असेल, तर त्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढावं लागेल. त्याला आपला खेळ बदलण्यासाठी भाग पाडावं लागेल. त्याला त्याच्या अनुकूल खेळू दिलं, तर तो खतरनाक आहे” असं मार्नस लाबुशेन म्हणाला.

तो पूर्वीसारखा धोकादायक राहिलेला नाही

विराट कोहलीमध्ये आता ती गोष्ट राहिलेली नाही, असं ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंना वाटतं. आधी प्रत्येकवेळी विराट कोहली सामना करण्यासाठी तयार असायचा, पण आता तो पूर्वीसारखा धोकादायक राहिलेला नाही. ऑस्ट्रेलियन ओपनर उस्मान ख्वाजानुसार कोहली आता बदललाय. त्याच्यासोबत हास्य, विनोद केला जाऊ शकतो. पण तो अजूनही धावा करु शकतो” हे उस्मान ख्वाजाने मान्य केलं.

मिचेल स्टार्क काय म्हणाला?

आयपीएलमध्ये विराट कोहलीसोबत खेळणारा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क म्हणाला की, “मी विराट सोबत नव्या युद्धासाठी उत्सुक आहे. मी विराटला चिथावणी देण्याचा प्रयत्न करणार नाही. फक्त आपल्या गोलंदाजीतून बोलेन”