T20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसोबत अखेर तेच झालं, जे होणार होतं. बाबार आजमच्या टीमच T20 वर्ल्ड कप 2024 च्या ग्रुप स्टेजमधून आव्हान संपुष्टात आलय. पाकिस्तानी टीमच्या वर्ल्ड कपमधील प्रदर्शनावर तिथली जनता प्रचंड नाराज आहे. त्यांच्या मनात राग आहे. खासकरुन भारताविरुद्धचा जिंकणारा सामना पाकिस्तानने गमावला. त्यामुळे पाकिस्तानी जनतेच्या मनातील संतापात आणखी भर पडली. पाकिस्तानी टीम टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्याच अधिकृतरित्या स्पष्ट झाल्यानंतर अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने पाकिस्तानी टीमवर निशाणा साधत आहेत. बाबर आजम आणि अन्य खेळाडूंना टीमच्या बाहेर करावं, या मागणीपर्यंत ठीक होतं. पण मोहम्मद हफीजने तर हद्द ओलांडलीय. कुर्बानीचा जनावर अशी भाषा करुन पाकिस्तानी टीमला वाईट पद्धतीने ट्रोल केलय.
ग्रुप ए मधून सुपर-8 ची फेरी गाठण्यासाठी भारतसोबत पाकिस्तानही प्रबळ दावेदार होता. कारण या ग्रुपमध्ये आशियाच्या या दोन बलवान संघांशिवाय अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंड हे तुलनेने दुबळे संघ होते. स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर सगळी बाजीच पलटली. ग्रुप ए मधून सुपर-8 मध्ये भारतासोबत क्वालिफाय करणारी अमेरिका दुसरी टीम आहे.
Qurbani Kay Janwar Hazir Hon… 🐐 🐐🐐🐐🐐🐐….. #PakistanCricket
— Mohammad Hafeez (@MHafeez22) June 14, 2024
बाबर आजमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी टीमने T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सुमार दर्जाच प्रदर्शन केलं. त्यावरुन पाकिस्तानी टीममध्ये मोठी नाराजी आहे. पाकिस्तानी क्रिकेटमधील दिग्गजांनी टीम आणि PCB विरोधात मोर्चा उघडला आहे. मोहम्मद हफीज, अहमद शहजाद यांनी आपआपल्या पद्धतीने टीमवर टीका केली.
पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजाद म्हणाला की, “निसर्ग आणि दुसऱ्या टीमवर अवलंबून असलेल्या टीम्सची अशीच स्थिती होते. ज्या टीम्स सुपर 8 मध्ये जाण्यासाठी लायक होत्या, त्या पोहोचल्या. आता पाकिस्तानी टीमसोबत पीसीबी काय करणार? ते पहायचय”
पाकिस्तान क्रिकेटमध्ये प्रोफेसर म्हणून ओळखला जाणारा मोहम्मद हफीजने तर पाकिस्तानी टीमला कुर्बानीचा जनावर म्हटलं. कुर्बानीच्या जनावराने हजर व्हाव असं त्याने त्याच्या एक्स हँडलवर म्हटलं आहे.