मुंबई : भारताचा लॉर्डसमधील ऐतिहासिक नेटवेस्ट सिरीजमधील विजय कोणताही क्रिकेट फॅन कधीही विसरणार नाही. कारण या मॅचने भारतीय क्रिकेटचा चेहरमोहरा बदलल्याची जाणीव करून दिली. या विजयातील हिरो होता भारताचा जबरदस्त फिल्डर आणि मधल्या फळीचा फलंदाज मोहम्मद कैफ युवराज सिंहच्या साथीनं खिंड लढवत मोहम्मद कैफन त्या दिवशी मैदान गाजवलं आणि भारताला पराभवाच्या दाढेतून काढून विजयच्या उंबरठ्यापार नेलं. मोहम्मद कैफची ही खेळी क्रिकेट रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवते.
विजयानंतर मोहम्मद कैफ पोस्टरबॉय बनला
आज 1 डिसेंबर मोहम्मद कैफचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त मोहम्मद कैफचा नेटवेस्ट सिरीजच्या फायनलमधील शानदार खेळ आठवतो. सुरूवातील बॅटिंग कर इंग्लंडने या सामन्यात धावांचा डोंगर उभा केला होता. भारतीय गोलंदाची या मॅचमध्ये कंबर तोडली होती. त्यानंतर भारताच्या डावाची सुरूवात चांगली झाली. सौरव गांगुली आणि विरेंद्र सेहवाग या सलामी जोडीनं चांगली सुरूवात करून दिली. मात्र सलामीची जोडी बाद झाल्यानंतर विकेट पाठोपाळ विकेट पडू लागल्या आणि भारताचा डाव कोसळला होता. युवराज सिंह एका बाजूने चांगली फलंदाजी करत होता. तर दुसरीकडून विकेटपाठोपाठ विकेट पडत होत्या.
कैफच्या घरचे गेले चित्रपट पहायला
या मॅचमध्ये सचिन आऊट झाल्यानंतर मोहम्मद कैफची फॅमिली मॅच हरणार असं समजून चक्क चित्रपट पहायला गेले. गांगुलीने कैफ मैदानात गेल्यानंतर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक युवराज सिंहला दे असं इशारा करून सांगितलं मात्र दुसऱ्याच बॉलवर शानदार सिक्स मारत कैफनं “हम भी खेलने आये है भाई” म्हणत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर शेवटपर्यंत शानदार बॅटिंग करत, एकवेळी हार समोर दिसत असताना भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर मोहम्मद कैफची चर्चाच चर्चा सुरू झाली. मोहम्मद कैफला भारताचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक म्हणूनही ओळखल जातं.