मुंबई : इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दौर्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा (Pakistan tour For England And West indies) करण्यात आली. या दौऱ्यासाठी संघात पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन खान (moin Ali) यांचा मुलगा आणि नवोदित खेळाडू आझम खान (Azam Khan) याला संधी देण्यात आली आहे. आझमला टी -20 मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. टी ट्वेन्टीसाठी आझमचं नाव धक्कादायक मानलं जातंय. कारण त्याने आत्तापर्यंत फक्त एकच प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. (Moin Khan Son Azam Khan Select Pakistan team For England West indies Tour)
त्याने आतापर्यंत 36 टी-20 सामने खेळले आहेत. तो एक विस्फोटक बॅट्समन म्हणून ओळखला जातो. मैदानाबाहेर षटकार खेचण्यात तो माहिर आहे. पाकिस्तान सुपर लीग आणि श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये त्याने आपल्या बॅटची जादू दाखवली आहे. त्याने पाकिस्तान संघात एन्ट्री करण्यासाठी जवळपास 30 किलो वजन कमी केले आहे.
मागील वर्षीपासून 22 वर्षीय आझम खान निवड समितीच्या नजरेत होता पण निवड समितीच्या सदस्यांनी त्याला वजन कमी करण्यास सांगितलं होतं. त्यावेळी त्याचं वजन सुमारे 130 किलो होतं. सध्याच्या परिस्थितीत आझम पाकिस्तानी खेळाडूंमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने खेळणारा फलंदाज आहे. त्याने टी -20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 157 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
पाकिस्तानी संघात निवड झाल्यानंतर आझम खूप भावूक झाला. तो म्हणाला, ‘मी ब्रेकफास्ट घेत असताना नबिल भाई (क्वेटा ग्लेडिएटर्सचा मीडिया मॅनेजर) मला म्हणाला की माझी टी -20 संघात निवड झाली आहे. मग मी नाश्ता बाजूला ठेवला आणि थेट वडिलांकडे (अब्बू) गेलो. भावनिक चित्रपटासारखं ते दृश्य होतं. मला इतक्या लवकर इतकी मोठी संधी मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मी आनंदी आहे कारण गेल्या वर्षापासून मी घेतलेल्या कष्टाचं मला फळ मिळालं, असं आझम म्हणाला.
टी 20 पाकिस्तान टीम : बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उप-कर्णधार), अरशद इकबाल, फहीम अशरफ, फखर जमा, हैदर अली, हारिस रौफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हाफीज, मोहम्मद हसनेन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर) , मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद (विकेटकीपर), शाहीन शाह आफ्रिदी, शरजील खान, उस्मान कादिर.
(Moin Khan Son Azam Khan Select Pakistan team For England West indies Tour)
हे ही वाचा :
Photos : बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देतीय ही भारतीय क्रिकेटर, सोशल मीडियावरही हवा!
WTC फायनलचं मैदान कोण मारणार, भारत की न्यूझीलंड?, ब्रेट ली म्हणतो…
भारताचा नवा यॉर्करकिंग मोहम्मद सिराजची रोहित शर्माबद्दल तक्रार, म्हणाला…